RSS News : आरएसएसचं ठरलं; विजयदशमी सोहळ्याला ‘या’ माजी राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणार

Vijayadashami Programme : विजय दशमी सोहळ्याला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहतात. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात सहभागी होतात.
Ramnath Kovind
Ramnath Kovind Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 22 August : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची देशभरातील स्वयंसेवक वाट बघत असतात. त्याहीपेक्षा प्रमुख पाहुणे म्हणून संघ कोणाला आमंत्रित करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असते. शताब्दी वर्षाची सांगता करून संघ 101 व्या वर्षात पदार्पण करणार असल्याने यंदाचा उत्सव खास राहणार आहे. संघाने या वेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे.

नागपूरच्या (Nagpur) रेशीमबाग येथील स्मृती भवन परिसरात येत्या 02 ऑक्टोबर रोजी स्थापना दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rss)विजय दशमी सोहळ्याला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहतात. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाच्या गणवेशात सहभागी होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा स्वयंसेवक आहेत. वर्षभरापूर्वी ते सरसंघचालकांना भेटायला संघ मुख्यालयात आले होते.

सुमारे ५८ वर्षांपूर्वी १९६६ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यात भाग घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा आदेश मागे घेऊन बंदी उठवली आहे. काँग्रेससह डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि संघटना संघापासून दोन हात लांबच राहणे पसंत करतात. असे असले केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर यात आता बरीच शिथिलता आली आहे.

Ramnath Kovind
BJP Politics : उपराष्ट्रपदीपदाच्या उमेदवाराचे नक्षल कनेक्शन, बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर भाजपचा हल्लाबोल, ठाकरे पवारही टार्गेट

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील मंत्री आणि आमदारांना संघ कार्यालयात बोलावले जाते. त्यांचा वर्ग घेतला जातो. महायुतीत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी खासदार तथा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संघ परिवाराच्या राष्ट्र सेवा समितीच्या दिल्ली येथे झालेल्या एका बैठकीला हजेरी लावली. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Ramnath Kovind
Aaditya Thackeray On Best Result : ‘बेस्ट’मधील पराभवावर आदित्य ठाकरेंचे प्रथमच भाष्य; म्हणाले, ‘...तेव्हा तुम्हाला दोन बंधूंची ताकद दिसेल’

उपमुख्यमंत्री अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी पत्नी प्रत्येक मिनिटाला, कुठल्या कार्यक्रमाला जाते, याचा हिशेब मी ठेवत नाही, असे सांगून त्यावर भाष्य करण्यास टाळले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे सांगून उगाच राजकीय वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र उघडपणे संघ मुख्यालयात गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com