Modi's Yavatmal Tour : मोदींच्या सभेसाठी उभारण्यात येणारा मंडप कोसळला; चार जखमी

Yavatmal Accident : डोम उभारण्याचे काम सुरू असताना पिलर जमिनीतून निखळला
Narendra Modi Meeting Place.
Narendra Modi Meeting Place.Sarkarnama
Published on
Updated on

Modi's Yavatmal Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी यवतमाळमध्ये उभारण्यात येत असलेल्या सभा मंडपाचा डोम पिलर कोसळला. या अपघातात चार श्रमिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी श्रमिकांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी भारी येथे सभा मंडप उभारला जात आहे. रविवारी भारी येथे भारी गावात 26 एकर जागेवर हा मंडप उभारण्याचे काम सुरू होते.

उभा मंडपासाठी डोम उभा करण्याचे काम सुरू असताना त्याचा पिलर जमिनीतून निखळला त्यामुळे त्याचे खांब खाली तीन क्रेन वर कोसळले. त्याखाली काही कामगार काम करत होते. या दुर्घटनेत चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमी मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धावाधाव करीत श्रमिकांना पिलरखालून बाहेर काढले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi Meeting Place.
Modi's Yavatmal Tour : भावनाताई आपली कामेही सांगणार की केवळ ‘मोदी है तो मुमकीन है’चे गुण गाणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू असताना मंडप कोसळून चार जण गंभीर झाल्याची घटना कळल्यानंत अनेकांनी भारीकडे धाव घेतली. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी मंडपाचे काम सुरू असताना हा अपघात घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डोम उभारले जात असतानाच त्याचे तीन पिलर खाली कोसळल्याचे सांगण्यात आले.

मोदी यांचा चौथा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत, ते चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 2004 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते यवतमाळला आले होते. त्यावेळी त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. 20 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना त्यांनी यवतमाळचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मोदींनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला होता. आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असल्याने महाराष्ट्र आणि यवतमाळ येथे येण्याची ही पंतप्रधानांची चौथी वेळ आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Narendra Modi Meeting Place.
Lok Sabha Election 2024 : मोदींच्या सुरक्षा ताफ्यासाठी येणार 700 इनोव्हा कार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com