Accident to MP Ashok Nete : सीटबेल्ट, एअरबॅगमुळं थोडक्यात बचावले गडचिरोलीचे खासदार अशोक नेते; नागपूरजवळ अपघात

Incident near Nagpur : सुदैवानं कुणाला दुखापत नाही; कारचं मात्र मोठं नुकसान
Accident to MP Ashok Nete
Accident to MP Ashok NeteSarkarnama
Published on
Updated on

Two vehicle collision : गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांचे वाहन ओव्हरटेक करीत असताना भरधाव सहा चाकी ट्रकला धडकले. मात्र, ‘सीटबेल्ट’चा वापर केल्यानं आणि वेळीच ‘एअरबॅग’ उघडल्यानं खासदार नेते, चालक, स्वीय सहायक व त्यांचे सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले. नागपूरजवळील अड्याळी फाट्याजवळ हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली-चिमूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जो तो खासदार नेते यांना फोन करून ते सुरळीत असल्याची खात्री करीत होता.

खासदार अशोक नेते ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. अड्याळी फाट्याजवळ त्यांच्या वाहनासमोर (क्रमांक : एमएच ३३ | एए ९९९०) अचानक टिपर (क्रमांक : एमएच ४९ | बीझेड ०६७४) आले. त्यात दोन्ही वाहनांची धडक झाली. या वेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व स्वीय सहायक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. खासदार अशोक नेते हे समोरील सीटवर होते. (Gadchiroli Chimur MP Ashok Nete's vehicle hit by a truck near Nagpur)

धडक होताच नेते यांच्यासह चालकाच्या बाजूला असलेली एअरबॅग उघडली. खासदार नेते, चालक व साऱ्यांनी सिटबेल्ट लावलेले होते. त्यामुळे सर्व सुखरूप बचावले. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली. नागरिकांनीही कारमधील प्रवाशांना मदत करण्यासाठी धाव घेतली. ट्रकला झालेल्या धडकेमुळं कारचा समोरचा भाग पूर्णपणे चपला. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. हुडकेश्वर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच. त्यांनी उमरेड मार्गावर धाव घेतली. तोवर खासदार अशोक नेते, त्यांचे स्वीय सहायक व पोलिस सुरक्षारक्षक अतुल शेलोकर हे सर्व घटनास्थळीच होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर खासदार नेते व त्यांच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या वाहनानं गडचिरोलीकडे मार्गस्थ केले. आपल्यासह वाहनातील सर्व जण सुखरूप आहेत. काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही. वाहनांचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीकडे वाहन रवाना करण्यात आल्याचं नेते यांनी या वेळी स्पष्ट केलं. या अपघातप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. खासदार नेते यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकातील कर्मचारीदेखील तैनात आहेत. त्यामुळं या अपघाताची सविस्तर माहिती ‘स्पेशल प्रोटेक्शन युनिट’च्या अधिकाऱ्यांनीही स्थानिक पोलिस व खासदार नेते यांच्या सुरक्षारक्षकांकडून घेतली.

(Edited By : Prasannaa Jakate)

Accident to MP Ashok Nete
Gadchiroli Crime : महागावात क्रोर्याची परिसीमा; परिवारातील पाच जणांच्या मृत्यूचे कारण उलगडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com