Gadchiroli Congress News : सोहळे कसले करताय? समस्यांना वाचा फोडा अन् सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे बघा !

Gacchiroli : जिल्हावासीयांना या निवडीचा आनंद होणे साहजिकच आहे.
Gadchiroli Program
Gadchiroli ProgramSarkarnama
Published on
Updated on

This picture is definitely not good for Congress. : कॉंग्रेस नेते आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. ते मूळ गडचिरोली जिल्ह्याचे असल्याने जिल्हावासीयांना या निवडीचा आनंद होणे साहजिकच आहे. पण हा आनंद साजरा करताना जनतेच्या समस्यांना वाचा फोडणे हे पहिले काम आहे आणि आपण सत्तेत नाही, याचे भान कॉंग्रेसजनांनी ठेवणे गरजेचे आहे. It is obvious that the residents of the district are happy)

काल (ता. १३) गडचिरोलीत वडेट्टीवार यांचा सोहळा महाविकास आघाडीतर्फे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा इतक्या भव्य प्रमाणात करण्यात आला की, वडेट्टीवार जणू मुख्यमंत्री झाले की काय, असा भास होत होता. सोहळा आयोजित करताना महाविकास आघाडीतील नेते, खासकरून कॉंग्रेस नेते हे सपशेल विसरले की, आपण सत्तेत नाही, तर विरोधात आहो. नेत्यांना असे वाटत होते की, आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आलो. हे चित्र कॉंग्रेससाठी निश्‍चित चांगले नाही.

वडेट्टीवारांचा सत्कार करणे योग्य आहेत. पण यामध्ये स्थानिक समस्यांवर चर्चा करणे, त्याची माहिती देणे, समस्यांना वाचा फोडणे, त्यासाठी आंदोलनांची रूपरेषा ठरवणे, सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती तयार करणे यावरही कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चा करणे गरजेचे आहे.

कारण पुढे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी आत्तापासून तयारी केली तर काही भवितव्य आहे, नाही तर काही खरे नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Gadchiroli Program
वडेट्टीवार बोलले ; BJP - shivsena च्या नेत्यांना झोंबलं | Wadettiwar | Mungantiwar | Shewale

गडचिरोलीसह पूर्व विदर्भात सध्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये चांगला उत्साह आहे. कारण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने दमदार विजय मिळवला. हा उत्साह कायम ठेऊन पुढील निवडणुकांची तयारी करण्याची आज गरज आहे.

नेते कार्यकर्ते सत्कार सोहळ्यांमध्येच दंग राहिले तर हा उत्साह थंड पडण्याची दाट शक्यता आहे. गडचिरोलीत कॉंग्रेसला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तेव्हाच भाजप खासदार अशोक नेते यांना तगडी टक्कर देता येईल.

Gadchiroli Program
Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

खासदार नेतेंना लढत देऊ शकेल, असा उमेदवार सध्यातरी कॉंग्रेसकडे दिसत नाही. विधानसभेसाठी भाजप उमेदवार बदलू शकते. त्यामुळे येथेही कॉंग्रेसची स्थिती चांगली असेल असे म्हणता येत नाही. आरमोरी विधानसभेत कृष्णा गजबे यांचा पराभव करू शकणारा उमेदवार दृष्टिक्षेपात नाही.

अहेरी विधानसभेत नुकतेच अन्न व औषधी प्रशासनमंत्री झालेले धर्मरावबाबा आत्राम यांचा प्रभाव आणखी वाढलेला आहे आणि धर्मराव गडचिरोली (Gadchiroli) लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. अहेरीत त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम लढण्याची पूर्ण शक्यता आहे. येथे भाजपसोबतच (BJP) त्यांची टक्कर होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसला (Congress) मध्यम मार्ग काढण्याची संधी आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com