Gadchiroli Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला आपले लोक सांभाळता येत नाहीत, त्याला आम्ही काय करणार?

Vijay Wadettiwar News : गडचिरोली हा काँग्रेस नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गृहजिल्हा आहे. उसेंडींच्या रूपाने काँग्रेसला पडलेले भगदाड ते कसे बुजवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Gadchiroli Lok Sabha Election 2024 Updates : आम्ही काही साधू संत नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी आपणावर आहे. जे पक्षात येतील त्यांचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेसला आपल्या आमदार, खासदारांना सांभाळता येत नाही.

नेतृत्वच अस्थिर व आश्वासक नसल्याने माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार भाजपमध्ये येत आहेत. भाजपवर फोडाफोडीचे आरोप करण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

गडचिरोली जिल्ह्यातील माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काल (ता. 26) भाजपत प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी नेते उसेंडी यांच्या पक्षबदलाने काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गडचिरोली हा काँग्रेस नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गृहजिल्हा आहे. उसेंडींच्या रूपाने काँग्रेसला पडलेले भगदाड ते कसे बुजवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule
Gadchiroli Chimur Lok Sabha Constituency : राजकारणाकडे सेवेची संधी म्हणून पाहणारे डॉ. नामदेव किरसान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी उसेंडी यांनी आपल्यावर आणि आदिवासी समाजावर काँग्रेसने अन्याय केल्याचा आरोप केला. दोन वेळा लोकसभा आणि एक वेळेस विधानसभेची उमेदवारी काँग्रेसने उसेंडी यांना दिली होती.

या वेळी त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, काँग्रेसने भाकरी फिरवताच उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थेट काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले आहे. उसेंडी यांच्यासह २२ जिल्ह्यांतील आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

गडचिरोलीत षडयंत्र...

मागील निवडणुकीत मोदी लाटेत चंद्रपूरचा अपवाद वगळता सर्वच उमेदवार पराभूत झाले होते. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. यांपैकी सर्वच उमेदवारांना विधानसभेची उमेदवारी देऊन पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. मात्र, आपणास डावलण्यात आले. काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने आपल्या विरुद्ध षडयंत्र रचले.

लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली. यात मोठा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. राज्यातील काँग्रेस नेते गटबाजीत व्यस्त ते आदिवासी समाज आणि गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत. हे दिसत असल्याने आपण काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे नामदेव उसेंडी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

Chandrashekhar Bawankule
Gadchiroli Lok Sabha Election : ‘ते’ तिकडचे राजे, इकडचा राजा मी आहे; कोण म्हणालं असं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com