गडकरींनी मानले न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांचे आभार

शंभर कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या न्यालयीन कोठडीत आहेत.
Nitin Gadkari

Nitin Gadkari

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : नागपूर-काटोल चौपदरी रस्त्याचा कामासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मदत केली म्हणून वन विभागाने या कामाला मंजुरी दिली.अन्यथा हे काम मार्गी लागले नसते. या शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अनिल देशमुख यांने आभार मानले.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
निवडणुकांची लगबग; PM मोदींनी उत्तरप्रदेशला दिला ७०० कोटींचा प्रकल्प

या रस्त्याचा आज शुभारंभ झाला.यावेळी गडकरी यांनी देशमुख यांची आठवण काढत त्यांचे आभार मानले. शंभर कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणात देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ‘‘ या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले.वास्तविक इतक्या वर्षात इथे कुठल्याही गावात वाघ शिरला नाही. मात्र, वाघाच्या अधिवासाचे कारण सांगत मंजुरी देण्यात येत नव्हती.अनिल देशमुख यांनी मदत केली तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली.या करता त्यांचे मी आभार मानतो.’’

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
रोहित पवारांची ऑफर; पंकजा मुंडेंनी विचार केला तर त्यांच्यासाठी खुर्ची सोडू!

शंभर कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यालयीन कोठडीत आहेत.या प्रकरणात देशमुख यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांची नावे आरोपपत्रात घेण्यात आल्याने देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या ७०० पानांच्या पुरवणी आरोपपत्रात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हणून नाव दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ तास चौकशी केल्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुख यांना अटक केली.अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना शहरातील हॉटेल्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.या साऱ्या पाश्‍र्वभूमीवर काटोल नगर परिषदेने आयोजित केलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देशमुख यांचे कौतुक करत आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com