Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

एक लाख कोटी रुपयांचा हायवे बांधणारे गडकरी नाही बांधू शकले घरासमोरचा रस्ता…

शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्यांना घेतले आणि त्यानंतर त्यांनी डिझाईन तयार केले. आत्ता कुठे ते काम मार्गी लागल्याचे गडकरींनी (Nitin Gadkari) सांगितले.
Published on

नागपूर : मी कधी थकत नाही, पण कधी कधी असं वाटतं की काम करावं की नाही. कारण १ लाख कोटी रुपयांचा मुंबई-दिल्ली हायवे जागेचे अधिग्रहण करून ग्रीन हावये बांधला. पण महालमधील माझ्या घरासमोरचा राजे मुधोजी हा २ किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता मी थकून गेलो, असे सांगत नितीन गडकरींनी एकच हंशा पिकवला.

एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, गेल्या ६ वर्षांपासून मी महालात गेलो नाही. सध्या बाहेर राहतो आहे आणि या रस्त्याचे काम सुरू असताना किती लोक या कामाच्या विरोधात न्यायालयात (Court) जातात आणि किती न्यायाधीश या कामाला स्टे देतात. न्यायालयाचा पूर्ण आदर सन्मान राखत यावरही एखादं पुस्तक लिहावं. येवढा मोठा हायवे (Highway) दोन वर्षांत बांधून तयार झाला. पण हा दोन किलोमीटरचा रस्ता करता करता धापा टाकून थकून गेलो. तरीही अजून काम होत नाहीये. मग आता ठरवलं की मॉडेल मिल चौकापासूनचा तो रस्ता मोठा करायचा आणि मेयो हॉस्पिटलपासून (Hospital) शहीद चौकापर्यंतचा रस्ता तोडून तो पुढे हरीहर मंदिरापर्यंत मोठा रस्ता करायचं ठरवलं आहे.

..तर तुमचं काम तोडून फेकून देईन

किराणा असोसिएशनला एक जागा दिली आहे. त्यासाठी रमेश मंत्री मला घेऊन गेले होते. त्यांना मी म्हणालो की, एनआयटीने जो धान्य बाजार बनवला होता, तेथे एकही व्यापारी आला नाही. कारण ते काम निकृष्ट दर्जाचे होते. तुम्ही जर तसे काम केले तर लक्षात ठेवा मी तुमचे सर्व काम तोडून फेकून देईन. मग मी त्या कामासाठी नेदरलॅंडचा आर्किटेक्ट निवडला, ते मुळचे अमरावतीचे आहेत, खांडेकर त्यांचे नाव. नंतर कोविड आला, हा काळ संपल्यावर त्यांना बोलावले, तर ते म्हणाले की आता माझे वय झाले, मी येत नाही. शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्यांना घेतले आणि त्यानंतर त्यांनी डिझाईन तयार केले. आत्ता कुठे ते काम मार्गी लागल्याचे गडकरींनी सांगितले.

Nitin Gadkari
गडकरी म्हणाले, ‘हा’ राज्य सरकारचा विषय, केंद्राचा असता तर मी आत्ता निर्णय घेतला असता..

मॉलमध्ये असले पाहिजे फेरीवाल्याचे दुकान..

फुटाळ्याच्या मागे पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या जागेवर तीन मजली इमारत तयार होते आहे. त्यामध्ये फुड मॉल आहे. फुटपाथवर खाणारे जे लोक आहे, त्यांची व्यवस्था तेथे करायची आहे. त्यासाठी त्या इमारतीमध्ये फेरीवाल्याचे दुकान असले पाहिजे. त्यामुळे गरीबांनाही मॉलमध्ये बसून खाता येईल. ते तीन मजले बनल्यानंतर वरती पुन्हा दोन मजले बनवायचे आहेत. तिथे तीन मल्टीप्लेक्स करायचे आहेत. त्याच्यावर रिव्हॉल्वींग रेस्टॉरंट बनवायचे आहे. तिथे इतर लोकंही खाण्याचा आस्वाद घेऊ शकतील. पण हे काम करता करता पैसे संपले. आता महाराष्ट्र सरकार, नागपूर महानगरपालिका आणि एनआयटी कुणाकडेही पैसे नाहीत. पण काम करायचे आहे, तेव्हा काही उपाय काढला पाहिजे. त्यामुळे आता वरचे २ मजले बीओटीवर देण्याचा विचार सुरू आहे. रेवती नावाच्या तामीळ आणि तेलगू सिनेमातील अभिनेत्री सध्या हे काम करत आहेत. जे जगात कुठेही नाही, ते नागपुरात झाले पाहिजे, असे मला नेहमी वाटत असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com