Chandrapur and Gadchiroli Districts Political News : उभ्या महाराष्ट्राला आपल्या ठुमक्यांनी वेड लावणारी नर्तिका गौतमी पाटील आता विदर्भातील रसिकांना आपल्या अदांनी घायाळ करणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील कोथुर्णा येथे २१ नोव्हेंबर रोजी गौतमी पाटील वाळूमाफीयांची करमणूक करण्यासाठी येणार आहे, पण त्याआधीच चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाळ खुर्द येथे गौतमीच्या ठुमक्यांचा कार्यक्रम घेत आयोजकांनी पहिला नंबर लावला आहे. (Taking the program of Gautami Patil the organizers have performed the first number)
उद्या १९ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील व्याहाळ खुर्द येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी दोन्ही जिल्ह्यांतील गौतमीप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे.
कार्यक्रमाच्या पासेस संपल्या असून, आम्हाला पास मिळतील का, अशी विचारणा होऊ लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील कोथुर्ण्याच्या आधीच चंद्रपूरच्या रसिकांनी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करत झाडीबोलीत नव्या कलाविष्कार आणला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन्ही जिल्ह्यांतील तरुणाईत गौतमीचे ठुमके बघण्यासाठी ‘जोश’ निर्माण झाला आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला वैनगंगा नदीचे सीमाबंधन आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात दारूची अनेक दुकाने आहेत.
दारूबंदी असलेल्या गडचिरोलीतील तळीरामांसाठी या गावातील दारू दुकाने वरदान ठरली आहेत. वैनगंगेचे मोठे नदीपात्र असलेल्या या गावात बरेच जण रेतीविक्रीच्या कामात गुंतले आहेत.
दारूची भरपूर दुकानं असलेल्या व्याहाळमध्ये आता गौतमीच्या ठुमक्यांच्या तालावर नाचण्याचे वेध अनेकांना लागले आहेत. गावोगावी याचे बॅनर्स लागले आहेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था करताना पोलिस विभागाचीही दमछाक होणार आहे.
व्याहाळ येथे १९ ऑक्टोबर रोजी होणार असलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजुरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, संदीप गड्डमवार, नामदेव किरसाम आदींची उपस्थिती राहणार आहे. व्याहाळमधील गौतमी पाटील यांच्या लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन निखिल सुरमवार व मित्र परिवारांनी केले आहे.
गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यति’ करण्यासाठी निखिल सुरमवार व मित्रमंडळी गेल्या महिनाभरापासून नियोजन करत आहेत. सुरमवार यांची मुख्य रस्त्याला लागून पाच एकर जागा आहे. याच मैदानावर गौतमी पाटीलचे ठुमके बघायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम पूर्णतः मोफत आहे. कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथील साउंड सिस्टिम बोलाविण्यात आला आहे.
लाखो रुपयांच्या बजेटच्या या कार्यक्रमासाठी जोरदार नियोजन सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच गौतमी पाटील येत आहे. त्यामुळे तरुणाईसह गौतमी पाटील यांच्या हजारो चाहत्यांमध्ये मध्ये ‘हाऊ इज द जोश’ बघायला मिळत आहे. कार्यक्रमासाठी जिल्हा पोलिस मुख्यालयातून परवानगी घेण्यात आली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.