EVM News : ईव्हीएमचे सील तुटले की तोडले? प्रचंड गोंधळ, तणावग्रस्त परिस्थितीत अधिकाऱ्याची विकेट

Gondia EVM seal break : गोंदियाच्या सालेकसा तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएमचे सील तुटल्याने मोठा तणाव निर्माण झाला. सर्वपक्षीय आंदोलनानंतर तहसीलदार मोनिका कांबळे यांची निवडणूक अधिकारीपदावरून तात्काळ बदली करण्यात आली.
EVM
EVM Sarkarnama
Published on
Updated on

Gondia EVM News : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममधील एका ईव्हीएमचे सील तोडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी याचा विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयाला घेराव घातल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे आंदोलन चिघळत असल्याचे बघून प्रशासनाने तडकाफडकी तहसीलदार मोनिका कांबळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून हटवले आहे. त्यांच्याऐवजी आता अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरपरिषदेचे मतदान आटोपल्यानंतर तहसील कार्यालयात ईव्हीएमचे सील तुटले असल्याचे आढळले. याची माहिती उमेदवार, त्यांचे समर्थक व शहरवासींना होताच बुधवारी (ता. ३) त्यांनी तहसील कार्यालयात एकच गोंधळ घातला. संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या.

तहसील कार्यालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरूच होता. गुरुवारीदेखील सकाळपासून तणावपूर्ण वातावरण होते. तथापि, शहरात सर्वपक्षीय नेते तसेच नागरिकांनी निवडणूक आयोग व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शहरातील मुख्य चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. अधिकाऱ्यांना घेराव घातला.

EVM
Gondia politics : सरकार कोणाचंही असो, दिग्गज नेत्यांनाही मानवलंच नाही गोंदिया; सहा वर्षांत सात पालकमंत्री, ही आहे हिस्ट्री..

या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पारदर्शक व निःपक्ष चौकशी करावी, देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे, सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद कांबळे यांच्या मोबाइल फोन डेटाची तपासणी करावी, या तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

EVM
Bhandara Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदियात ‘भेल’वरून पुन्हा तापतेय राजकारण !

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सद्यःस्थितीत सालेकसा येथे तणावपूर्ण वातावरण असून, पोलिस छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांच्या मोबाइल फोन डेटाची तपासणी करावी, सहायक निवडणूक अधिकारी प्रमोद कांबळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com