Gondia Guardian minister
Gondia Guardian minister Sarkarnama

Gondia politics : सरकार कोणाचंही असो, दिग्गज नेत्यांनाही मानवलंच नाही गोंदिया; सहा वर्षांत सात पालकमंत्री, ही आहे हिस्ट्री..

Guardian ministers in Gondia News : प्रत्येक सत्तांतरानंतर मंत्रिमंडळात बदल झाले, आणि त्यामुळे पालकमंत्र्यांमध्येही बदल झाले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला गेल्या सहा वर्षात सात पालकमंत्री मिळाले आहेत.
Published on

Gondia news : गोंदिया जिल्हा हा स्थानिक पालकमंत्र्याच्या बाबतीत दुर्दैवी ठरला आहे. 1999 मध्ये भांडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळेसपासून महादेवराव शिवणकर व राजकुमार बडोले हे दोन पालकमंत्री वगळता इतर पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातीलच राहिले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या काळात राज्यात दोन वेळा मोठी राजकीय सत्तांतरे झाली. प्रत्येक सत्तांतरानंतर मंत्रिमंडळात बदल झाले, आणि त्यामुळे पालकमंत्र्यांमध्येही बदल झाले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला गेल्या सहा वर्षात सात पालकमंत्री मिळाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अस्थिर युतीचे राजकारण, पालकमंत्र्यांवरील कायदेशीर कारवाई आणि जिल्ह्याच्या विकासाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे गोंदिया जिल्ह्याला वारंवार पालकमंत्री बदलला सामोरे जावे लागत आहे. 2019 पासून आता पर्यंत जवळपास सात पालकमंत्री पाहवयास मिळाले आहेत.

Gondia Guardian minister
BJP’s Surgical Strike : निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का, कोल्हेंनी दादांपासून ज्या नेत्याला तोडलं, आता भाजपने त्याला आपल्याकडे ओढलं

राजीनाम्याची करणे पुढीलप्रमाणे :

1999 मध्ये भांडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, सुरुवातीच्या 14 वर्षात जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री होते. त्यानंतर 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अर्जुन मोरगावी मतदारसंघातील भाजपचे (BJP) मंत्री राजकुमार बडोले पहिल्यांदा पालकमंत्री झाले होते. ते साडेचार वर्ष पालकमंत्री होते तर शेवटच्या सहा महिन्यासाठी परिणय फुके पालकमंत्री होते.

Gondia Guardian minister
Devendra Fadnavis: 'PMC'च्या निवडणुकीत भाजपसाठी अवघड असलेल्या प्रभागांबाबत CM फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन

त्यानंतर 2019 साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यावेळी गोंदिया जिल्हयाला गेल्या पाच वर्षात चार पालकमंत्री लाभले. आघाडी सरकार असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे 2019 ते 2022 या काळात मंत्री होते. त्यांना आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2022 साली माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे पालकमंत्रीपद आले. त्यांना 2022 साली अटक करण्यात आल्यानंतर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवस मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाल्कमंत्रीपदाचा हंगामी पदभार होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले होते.

Gondia Guardian minister
BJP Politics: इचलकरंजीत भाजपने बॉम्ब फोडला, राष्ट्रवादीवर नाराज होत विठ्ठल चोपडेंसह मातब्बरांनी पक्ष सोडला

त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत येऊन जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्याकडे एक वर्ष पदभार सोपविण्यात आला होता तर ऑक्टोबर 2023 मध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे वर्षभर पालकमंत्री पद होते. त्यानंतर निवडणुका झाल्या.

Gondia Guardian minister
Congress-MNS : काँग्रेसचा मोठा निर्णय; आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी चाचपणी?

2024 साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला लातूर जिल्ह्यातील बाबासाहेब पाटील हे पालकमंत्री होते. त्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये तब्येतीच्या कारणाने पालकमंत्री पद सोडले. आता त्यांच्या जागी इंद्रनील नाईक यांच्याकडे पालकमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Gondia Guardian minister
Ajit Pawar NCP : चिपळूणमध्ये महायुतीला तडा? निवडणुकीपूर्वीच ‘दादां‌’च्या राष्ट्रवादीने ठोकला शड्डू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com