Gondwana University : देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार डॉक्टर; मुनगंटीवारांनाही उपाधी

Graduation Ceremony : गोंडवाना विद्यापीठाच्या सभेत निर्णय
Gondwana University Gadchiroli
Gondwana University GadchiroliSarkarnama
Published on
Updated on

Gondwana University : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्य व्यवसायमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आता डॉक्टर होणार आहेत. राज्यात फडणवीस पुन्हा डॉक्टर होणार आहेत. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या विशेष सभेत या दोन्ही नेत्यांना डी. लिट पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच या दोन्ही नेत्यांना समारंभपूर्वक ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून 2 ऑक्टोबर 2011 रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश असलेले गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत स्थापन करण्यात आले. माओवादग्रस्त व मागास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या मागील हेतू होता. गडचिरोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 129 (1), (2) मधील तरतुदीच्या अनुषंगाने विद्यापीठाची सामान्य पदवी प्रदान करण्यासाठी दोन नावे कुलपती रमेश बैस यांच्याकडे प्रस्तावित केली होती. उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य, वन व मत्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांच्या नावांना राज्यपालांनी मान्यता प्रदान केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gondwana University Gadchiroli
Shinde - Fadnavis News : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस दोघेही डॉक्टर ; 'सर्जरी'साठी कुणाचा नंबर लावणार ?

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात उद्योगाचे जाळे उभारण्यावर भर दिला. त्यांच्याच पुढाकाराने गडचिरोलीसारख्या माओवादग्रस्त जिल्ह्यात सूरजागड, लायन्स मेटल यांसारखे मोठे प्रकल्प आता सुरू झाले आहेत. वाढत्या उद्योगांमुळे येत्या काळात गडचिरोली ‘स्टिल हब’ म्हणून नावारूपास येणार आहे. सुधीर मुनगंटीवार हेदेखील चंद्रपूरचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी शैक्षणिक विकासाकरिता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा अतिशय महत्त्वाचा ठरला होता.

देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राजकीय क्षेत्रात आपल्या अलौकिक कागगिरीचे प्रदर्शन केले आहे. आता हे दोघेही एकाच वेळी ‘डॉक्टर’ होणार आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांना विद्यापीठाची सामान्य पदवी बहाल करण्याची संमती मिळविण्याकरिता अधिसभेपुढे हा प्रस्ताव ठेवला होता. त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. काही दिवसांत गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा दीक्षान्त समारंभ होणार आहे. या समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांना डी. लिट.पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ही माहिती दिली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Gondwana University Gadchiroli
Murlidhar Mohol : देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा डॉक्टर झाले अन् मुरलीधर मोहोळ त्यांना मुख्यमंत्री करून मोकळे झाले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com