सरकार संकटात, ऊर्जामंत्री बिनधास्त; मुलांसोबत लुटला क्रिकेटचा आनंद !

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) सरकार जाणार की राहणार, या चिंतेपासून दूर असल्याचे रविवारी दिसून आले.
Dr. Nitin Raut was playing Cricket.
Dr. Nitin Raut was playing Cricket.Sarkarnama

नागपूर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने पाठिंबा काढल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. सरकारमधील सर्वांवरच संकटाचे ढग आणखी गडद झाले आहे. परंतु ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी मात्र तणावाच्या वातावरणातही बिनधास्तपणे लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोरांना आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलासा दिल्याने सरकारचे पाय आणखी खोलात असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या स्थितीवरून गेल्या आठवडाभरापासून राज्यात तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे राष्ट्रवादीसोबत कॉंग्रेस नेत्यांनीही ग्वाही दिली. तरीही सरकार जाणार की राहणार, यावरून सारेच चिंतेत आहेत. परंतु राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सरकार जाणार की राहणार, या चिंतेपासून दूर असल्याचे रविवारी दिसून आले.

काल, रविवारी त्यांनी उत्तर नागपुरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मतदारसंघात पाहणी दौरा केला. बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयातून डॉ. राऊत यांनी दौऱ्याची सुरुवात केली. हा दौरा करताना त्यांनी जरीपटका, महावीरनगर, मिसाळ ले-आऊट, इंदोरा, विश्वासनगर, आहुजानगर, नागार्जून कॉलनी, नारा, आर्यनगर, पवनपुत्र सोसायटी, समतानगर, तारकेश्वरनगर, संन्यालनगर, ठवरे कॉलनी, न्यू ठवरे कॉलनी, चॉक्स कॉलनी, कळमना, कामनानगर, बेलानगर, विशालनगर, बालाजीनगर, बेलेनगर, वाजपेयी नगर, चिंतामणीनगर, तुकारामनगर, गुलशननगर, संगमनगर, वांजरा ले-आऊट, यशोधरनगर, हमीनगर, टिपू सुलतान चौक, महबूब पुरा, संघर्षनगरचा भाग पिंजून काढला.

Dr. Nitin Raut was playing Cricket.
Video: विमानतळावरच करा प्रवाशांची चाचणी...; नितीन राऊत

या दौऱ्यादरम्यान ते चैतन्यनगर येथील मैत्री बुद्ध विहाराच्या आवारात पोहोचले. तिथे लहान मुले क्रिकेट खेळत होती. त्यांनी या मुलांमध्ये सहभागी होऊन क्रिकेट खेळण्याचा आनंदचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी मुलांनी टाकलेले चेंडू बॅटने टोलविले.

सरकार पडण्याचे संकेत ?

गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री डॉ. राऊत यांना भेटण्यासाठी अनेकजण त्यांच्या कार्यालयात येत होते. परंतु रविवारी पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, जुने सहकारी, मित्र, नातेवाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. राज्य सरकारवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार पडण्याचे संकेत मिळाल्यानेच पालकमंत्री घरापर्यंत पोहोचल्याची कुजबुज परिसरात होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com