Gram Panchayat Election: ग्रामपंचायतीची रणधुमाळी : आमदार मेघे, माजी मंत्री बंग, उपाध्यक्ष राऊत यांची प्रतिष्ठा पणाला...

Nagpur Gram Panchayat Election: नागपूर शहरानजीकच्या हिंगणा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.
Rameshchandra Bang, MLA Samee Meghe and Kunda Raut
Rameshchandra Bang, MLA Samee Meghe and Kunda RautSarkarnama
Published on
Updated on

Gram Panchayat Election : नागपूर (Nagpur) शहरानजीकच्या हिंगणा तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. राज्य सरकारच्या (State Government) निर्णयानंतर सरपंच थेट जनतेतून निवडून द्यायचा आहे. त्यामुळे चुरस चांगलीच वाढली आहे. ग्रामपंचायतीची (Grampanchayat) निवडणूक आगामी सर्व निवडणुकांची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष कसून कामाला लागले आहेत. पण मतदार पक्षापेक्षा उमेदवार कोण व कसा आहे, याची चाचपणी करीत आहे.

सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर ताबा मिळवण्यासाठी भाजप आमदार समीर मेघे, (Sameer Meghe) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी जिल्हा परिषद (ZP) सत्तापक्ष नेते बाबा आष्टनकर, वरिष्ठ नेते विठ्ठलराव कोहाड, शिवसेना (Shivsena) तालुकाप्रमुख जगदीश कन्हेर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हिंगणा तालुक्यातील रायपूर, नागलवाडी, वागदरा, कवडस, उमरी वाघ, चिंचोली पठार, खैरी पन्नासे येथे ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. ग्रा.पं.ची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट होत आहे. रायपूरमध्ये भाजप व काँग्रेसच्या बाबा आष्टणकर गटाने सरपंच पदासाठी युवा नेते उमेश आंबटकर यांना रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कुंदा राऊत व विठ्ठलराव कोहाड गटाने माजी उपसरपंच दीपावली कोहाड यांना मैदानात उतरविले आहे. या गावातील निवडणुकीकडे सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागले आहे. कारण माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे हे गाव आहे.

Rameshchandra Bang, MLA Samee Meghe and Kunda Raut
Grampanchyat Election : मुंडेचा `गड` असलेल्या पांगरीची ग्रामपंचायत धनंजय यांच्या ताब्यात..

उमरी वाघ ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच युवा नेते नरेंद्र वाघ यांनी सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणले. केवळ सरपंच पदाकरिता निवडणूक होत आहे. रायपूर, वागदरा, नागलवाडी, खैरी पन्नासे, चिंचोली पठार या ग्रा.पं.निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना विकासाचे प्रलोभन दाखविणे सुरू आहे. मतदार राजा आता सुज्ञ झाला आहे. यामुळे गावाचा विकास खऱ्या अर्थाने कोण करेल, याची चाचपणी मतदार राजा स्वतः करणार आहे. राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक उमेदवार कसा आहे .यावर मतदारांचा जास्त भर राहणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व इतर पक्षासह स्वतंत्र लढणाऱ्या उमेदवारांचीही तारेवरची कसरत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com