Grampanchayat Election : हंसराज अहिरांच्या प्रयत्नांनंतरही सावळीमध्ये भाजपचा दारूण पराभव

Grampanchayat Election : निकाल एकतर्फी लागल्याने भाजपच्या गोठ्यात सन्नाटा पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
BJP-Congress
BJP-CongressSarkarnama
Published on
Updated on

Grampanchayat Election Result : राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती येत आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सावळी सदोबा येथे अकरा सदस्य पदासाठी आणि एक सरपंचपादासाठी चुरशीची लढत झाली होती. मात्र, निकाल एकतर्फी लागल्याने भाजपच्या गोठ्यात सन्नाटा पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

BJP-Congress
Grampanchayt Election Result : गुलाल आपलाच, जिल्ह्यात सरशी आमचीच ; मुंडे बहिण-भावांचे परस्पर विरोधी दावे..

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. यावेळी सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. भाजपचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर (hansraj ahir) आणि भाजपचे आमदार संदिप धुर्वे यांनी लक्ष घातल्यानंतरही भाजपचा दारून पराभव झाला.

आतापर्यंत लागलेल्या निकालामध्ये भाजपावर मात करत सरपंचपदाचे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) प्रचंड मताने विजयी झाले. कॉंग्रेसच्या ११ पैकी ११ सदस्य निवडून आले. निकाल एकतर्फी लागल्याने भाजपामध्ये चांगलाच सन्नाटा पसरला आहे. कॉंग्रेसने एकुण ४५७ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, कॉंग्रेसची परिस्थिती अपक्ष पेक्ष वाईट असल्याचे दिसून आले.

BJP-Congress
Gram Panchayat Election: भाजप-शिंदे गटात तुफान हाणामारी ; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले असून अनेक ठिकाणी आघाडीवर आहेत. सर्व विजयी सरपंच व उमेदवारांचे अभिनंदन, गुलाल आपलाच असा दावा करणारे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com