Harshvardhan Patil : सत्ता नाही म्हणून काय झाले; सातबारा कोण बदलतोय का? हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्त्यांना बुस्टर डोस

NCP News : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा सांगली जिल्ह्यातील मेळावा शनिवारी पार पडला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना हर्षवर्धन पाटील यांनी, सत्ता नाही म्हणून काय झाले, सातबारा कोण बदलतोय का? असा शब्दांत मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा सांगली जिल्ह्यातील मेळावा शनिवारी पार पडला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, पण कोर्टात त्याची तारीख सुरू आहे, ते कधी पूर्ण होणार हे माहीत नाही. पण आज ना, उद्या या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आपण त्याची तयार केली पाहिजे.

सत्ता नाही म्हणून काय झाले, सातबारा कोण बदलतोय का? लोकसभेचे वातावरण विधानसभेला राहिले नाही. त्यामुळे कदाचित विधानसभेचे वातावरण स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बदलेल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी व्यक्त केला.

Harshvardhan Patil
MLC Election : इच्छुकांने वाढवले फडणवीसांचे टेन्शन; विधान परिषदेसाठी तब्बल 20 नावे भाजपने पाठवली दिल्ली दरबारी; कोणाला मिळणार उमेदवारी?

आपल्याकडे सत्ता नाही, त्यामुळे आपल्याकडे एकच काम आहे. एक मागणी करणे, दुसरे आंदोलन करणे आणि तिसरे काम आहे न झालेल्या कामावर संघर्ष करणे. आज जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. महिलांमध्ये लाडक्या बहिणेमुळे अशांतता आहे. लाडक्या बहिणी योजनेतून कमी झालेल्या बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Harshvardhan Patil
MLC Election: भाजपच्या गोटातून मोठी अपडेट; विधानपरिषदेसाठी मराठवाड्याला संधी, 'या' दोनपैकी एक नाव होणार फायनल ?

दुधाच्या प्रश्नाबाबत सभागृहामध्ये प्रश्न मांडा. दूध व साखरबाबत क्षणी वेळप्रसंगी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. परिस्थिती बदलणार आहे. सकारात्मक राहा, काही अडचण येणार नाही. पवार साहेबांवर विश्वास ठेवा, पक्ष आणि संघटना मजबूत करायची आहे, असा सल्ला हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

Harshvardhan Patil
MLC Election : एकनाथ शिंदे शब्द पाळणार! आत्महत्या करायला निघालेल्या नेत्याला आमदारकी देणार?

पक्षाने काय दिले यापेक्षा आता मी पक्षाला काय दिले, याचा विचार करा आणि यानंतरच आपल्याला सत्तेचा काळ येऊ शकतो. कार्यकर्त्यांनी ना उमेद होऊ नये, यावेळी शशिकांत शिंदे यांनी एक स्लोग्न दिली आहे. डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ठेवा, असा संदेश हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Harshvardhan Patil
Ajit Pawar : निधी वाटपावरून महायुतीत धुसफूस; अजितदादांवर शिंदे सेनेसोबतच आता भाजपची नाराजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com