Harshwardhan Sapkal News: ...तर मग विधान परिषदेत विरोधी पक्षनेता का नियुक्त केला जात नाही ? सपकाळांनी मुख्यमंत्र्यांनाच धरलं धारेवर

Opposition Leader Controversy: हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा लावून धरला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांचा असल्याचे सांगून हात झटकले आहे.
Harshawardhan Sapkal on BJP News
Harshawardhan Sapkal on BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा लावून धरला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांचा असल्याचे सांगून हात झटकले आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांच्यावतीने १० टक्क्यांचा नियम सांगितला जात आहे. याच मुद्यावर बोट ठेवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले.

ते म्हणाले, एकतर दहा टक्के सदस्यसंख्येचा नियमच नाही. तो असेल तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता का नियुक्त केला जात नाही, अशी विचारणा करून सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना यासाठी जबाबदार धरले.

विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदासाठी (Oppostion Leader Post) १० टक्के सदस्यसंख्येचा दाखला दिला जात आहे. मात्र वरच्या सभागृहात १० टक्के सदस्यसंख्या आहे व सरकारला प्रस्तावही दिलेला आहे. मग तेथे विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का घेतला जात नाही? लोकशाही व्यवस्थेत काही प्रथा, परंपरा व संकेत पाळले जातात, दोन्ही सभागृहाचे प्रस्ताव आहेत पण सरकारला संविधानानुसार कामकाज करायचे नाही.

हम करो सो कायदा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज रेटत आहेत. फडणवीसांनी लोकशाहीची बूज राखली पाहिजे. ते एवढा आव आणत असतात पण संकेत, नियम पाळत नाहीत. विरोधी पक्षनेतेपद देणे हा राजधर्म आहे पण फडणवीस त्यापासून पळ काढत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

Harshawardhan Sapkal on BJP News
Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेतेपदासाठी टाळाटाळ, ठाकरेंनी नार्वेकर,शिंदेंनाच गाठलं; भाजपला करुन दिली केजरीवालांच्या 'मोठेपणा'ची आठवण

नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजप महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार महिला सुरक्षा यासारखे असंख्य प्रश्न असताना अधिवेशनात त्यावर चर्चा होत नाही आणि कुठे कुत्री पकडा, बिबटे सोडा यावर चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाला अधिवेशनाचे काही गांभीर्यच राहिलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com