

Maharashtra political news : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण, यावर चर्चा सुरू आहेत. महायुती अन् महाविकास आघाडीतील नेते यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुंडेंना खोचक टोला लागवला आहे.
"OBC आणि मराठा ही लढाई गोपीनाथ मुंडेना मान्य नव्हती. मात्र त्यांचा एकही वारसदार हे पाळत नाही. मुंडेच्या सर्व वारसदारांनी एकदा एकत्र बसून, खरा वारसदार कोण, हे ठरवावं," असा टोला लगावला आहे.
बीडमध्ये (BEED) ओबीसी नेत्यांच्या महाएल्गार सभेत, मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला होता. करुणा मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असल्याचं म्हटलं. प्रकाश महाजन यांनी, पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार असल्याचं म्हटलं. यात आता हर्षवर्धन सपकाळ यांनी उडी घेत, थेट OBC आणि मराठा, यावरून डिवचत, गोपीनाथ मुंडेना ही लढाई मान्य नव्हती, असे म्हटले.
हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजप महायुती सरकारवर टीका केली. 'हे सरकार म्हणजे, 'गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन' आहे, या सरकारमध्ये सर्व काही अलबेल नाही. हे तीन पक्षाचं सरकार आहे यात टोळी युद्ध सुरू आहे. हे पाच वर्ष कसं काढतील हा कुतूहलचा विषय आहे,' असा टोला सपकाळ यांनी लगावला.
फलटण इथं महिला डॉक्टरांच्या आत्महत्याप्रकरणात महिला डॉक्टरांनं केलेले आरोप गंभीर आहेत. हे सरकार सज्जनाच्या बाजूने नाही तर दुर्जनांच्या बाजूने आहेत. सुसाइड नोट लिहिली, तर हे सरकार गायब करेल, म्हणून महिलेने हातावर लिहिले. सरकारची विश्वासार्हता यात गेली आहे. राज्यला पूर्ण वेळ गृह मंत्री हवा आहे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
कर्जमाफीच्या बाबतीत रोखठोक बोलणाऱ्या अजित पवार देखील भाजपची खोटं बोल पण रेटून बोल, ही शैली अवलंबली आहे. म्हणजे गुण नाही पण, वाण लागला, असं जे म्हणतात ते अजितदादांना लागू पडतं, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.