
Nagpur News: सावनेर तालुक्यातील नांदागोमुख ग्रामपंचायतीमध्ये मोठी राजकीय नाट्यमय घडामोड घडली. सरपंच व उपसरंपचांविरुद्ध सर्व सदस्यांनी मिळून अविश्वास ठराव पारित केला. मात्र, हे करत असताना एका अपात्र सदस्यानेही मतदान केले. आणि याच कारणामुळे अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे तुर्तास सरपंच (Sarpanch) आणि उपसरपंच बचावले आहे.
विशेष म्हणजे उद्याच मंगळवारी (ता.8) होणाऱ्या ग्रामसभेत अविश्वास ठरावानुसार सरपंच व उपसरपंचाविरोधात अपात्रतेची कार्यवाही केली जाणार होती. ज्योती नंदराज मोवाडे या नांदागोमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. त्यांच्यासह उपसरपंचाविरुद्ध इतर सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. या अविश्वास ठरावाविरोधात मोवाडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
या अविश्वास ठरावाविरोधात मोवाडे यांनी उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले. ही प्रक्रिया अवैध ठरवण्याची मागणी त्यांनी केले. या प्रक्रियेत ग्राम पंचायत सदस्य गौरव सदाशिव उईके यानीही मतदान केले आहे. उईके यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती
ठराविक कालावधीत त्यांनी हे प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. त्यानंतर त्यांचे सदस्यत्व आपोआपच रद्द झाले होते. असे असतानाही अविश्वास ठरावाच्या वेळी अधिकार नसताना उईके यांनी मतदान केले. या ग्राम पंचायतीमध्ये एकूण 12 सदस्य असून अविश्वास ठरावाच्या बाजूने नऊ मते पडल्याने दोन तृतीयांश या नियमाने ठराव पारित झाला.
उद्या मंगळवारी (ता. 7) ग्रामसभा होणार आहे. या सभेत सरपंच तसेच उपसरपंचांचे पद ठरावानुसार रद्द होणार होते. मात्र, त्यापूर्वीच या प्रक्रियेला न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजाववून या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. मोवाडे यांच्यातर्फे ॲड. आशुतोष धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. निरज करडे आणि ॲड. तेजस केणे यांनी सहकार्य केले.
या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. भाजपचे नागपूर जिल्ह्याध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे नांदागोमुख हे मूळ गाव आहे. ज्योती मोवाडे या कुंभारे गटाच्या असून भाजप समर्थित सरपंच आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे तूर्त कुंभारे गटाला दिलासा मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.