Sudhir Mungantiwar : कधी नव्हे ते मुनगंटीवारांचाही विरोधकांच्या सुरात सूर; काय आहे प्रकरण?

Sudhir Mungantiwar on number plate pricing : वाहनांच्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात आकारले जात आहेत. या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे दर अतिशय जास्त असल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 03 Mar : वाहनांच्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटचे (HSRP) सर्वाधिक दर महाराष्ट्रात आकारले जात आहेत. या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे दर अतिशय जास्त असल्याचे सर्वांचेच म्हणणे आहे.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी इतर राज्यांची जीएसटीचे दर जोडले नसल्याचे सांगून हे दर सारखेच असल्याचा दावा केला आहे. मात्र यामुळे कोणाचेही समाधान झाल्याचे दिसत नाही. यात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश आहे.

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर देशात कोणत्या राज्यात किती आहे याची माहिती आपण केंद्र सरकारकडे मागितली आहे. ते याबाबत काय माहिती देतात यानंतर याची खातरजमा केली जाईल. याच अभ्यास करून यावर प्रतिक्रिया दिल्या जाईल. गोवा आणि महाराष्ट्र लागून असताना दोन्ही राज्यांमधील दरांमध्ये तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांची तफावत आहे.

Sudhir Mungantiwar
Anil Deshmukh News : पोलिस सुरक्षा असताना कोरटकर फरार कसा झाला? अनिल देशमुखांना वेगळीच शंका

१८ टक्‍के जीएसटी आकारला तरी चाळीस ते पन्नास रुपयांचा फरक पडतो. आरटीओमार्फत मोठी लुटमार केली जात असल्याचा आरोप आहे. सर्वसामान्यांची लुबाडणूक केली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

याची दखल राज्य शासनामार्फत घेतली जाईल अशी आशा असताना मुख्यमंत्री दर योग्यच असल्याचे सांगितल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हे कंत्राट देण्यात आले होते. ते रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विरोधकांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी खर्च केलेले पैशाची भरपाई करण्यासाठी नंबर प्लेटचे दर वाढवण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.

Sudhir Mungantiwar
Dhananjay Munde: मुंडेंच्या राजीनाम्यावर फडणवीस काय निर्णय घेणार? मुनगंटीवार म्हणाले, 'कराडचा संबंध असेल तर...'

महाराष्ट्रातील कंत्राटदाराला परवडत नसेल तर गोव्याच्या कंत्राटदाराला काम देण्याची मागणी करण्यात आली आहे. तूर्तास यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. मुनगंटीवार यांना दराबाबत केंद्रातून माहिती मिळाल्यानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

कपात करण्यात आलेल्या सुरक्षेवर मुनगंटीवार म्हणाले, मी मागेपुढे पाहत नाही. कुणी काय केले यापेक्षा जो मिला ओ सही, जो मिला उसके साथ आगे बढना है. अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मंत्रालयातील फिक्सरची अनेकांना माहिती आहे. भीतीने डेस्क ऑफिसर सांगत नाही. त्यामुळे फिक्सरच्या विरोधात कडक कायदा करावा आणि नावे सांगणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस जाहीर करावे अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com