Heena Gavit News : हिना गावितांची हॅट्ट्रिक 'या' कारणामुळे हुकली; शिंदे गटाच्या माजी आमदाराचे खळबळजनक विधान

BJP Political News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला आहे. तरी या निवडणुकीचे कवित्व संपण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक ठिकाणी अद्यापही जय-पराजयाची चर्चा सुरूच आहे.
Heena Gavit , Vijaykumar Gavit
Heena Gavit, Vijaykumar Gavit Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला आहे. तरी या निवडणुकीचे कवित्व संपण्याचे नाव घेत नाही. प्रत्येक ठिकाणी अद्यापही जय-पराजयाची चर्चा सुरूच आहे. त्यातूनच सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या दोनवेळा खासदार राहिलेल्या हिना गावित (Heena Gavit) यांची हॅट्ट्रिक त्यांचे वडील विजयकुमार गावित यांच्यामुळेच हुकली असल्याचा दावा महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप (Bjp) उमेदवार डॉ. हिना गावित यांना काँग्रेसचे नवखे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पाडवी यांनी हिना गावित यांचा 1 लाख 59 हजार 120 मतांच्या फरकाने पराभव केला.

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे 74 हजार मतांनी विधानसभेला निवडून आले होते. त्याच विधानसभा मतदारसंघातून डॉ. हिना गावित यांना केवळ 30 हजारांचे मताधिक्य मिळाले.

त्यामुळे डॉ. हिना गावित यांच्या पराभवाला विजयकुमार गावित हेच कारणीभूत आहेत, असे सांगत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Heena Gavit , Vijaykumar Gavit
Devendra Fadnavis News : राज्यातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण; फडणवीसांची पोस्ट चर्चेत

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याचा फटका

त्यासोबतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्याचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला आहे.

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे ही पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे महायुतीला लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला, असा घरचा आहेर रघुवंशी यांनी दिला.

Heena Gavit , Vijaykumar Gavit
Uddhav Thackeray News : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन तयार; रणनीतीनुसार राज्यभर तयारी सुरु

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com