मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी काल दसरा मेळाव्यात (shivsena dasara melava) केलेल्या भाषणावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे. अतुल भातखळकर, आशिष शेलार यांच्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणाचा समाचार घेतला.
''भाजप सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते,'' असा सवालही दरेकर यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस व भाजप विषयीचा टोकाचा तिरस्कार वारंवार व्यक्त होताना दिसत होता, अशी टीका नेते प्रवीण दरेकर (bjp pravin darekar) यांनी केली.
प्रवीण दरेकर म्हणाले की, पंढरपूरच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान अवताडे व देगलूरच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार सुभाष साबणे हे उपरे आहेत, असे म्हणत असाल तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत ? शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचे किती निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, याचे उत्तरही शिवसेनेने द्यावे. सध्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंकरराव गडाख तर खासदार प्रियांका चतुर्वेदी ही मंडळी तर उपरीच आहेत ना?
''दसरा मेळ्यात राज्यातील जनतेला मुख्यमंत्री ठाकरे हे आघाडी सरकारचे दोन वर्षातील योगदान, व राज्य सरकारची पुढची दिशा याबाबत बोलतीस, अशी अपेक्षा होती, पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काय कामं झाली, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. पण, मुंबईच्या विकासाची काय स्थिती आहे, हे मुंबईकरांना चांगलेच माहीत आहे,'' असे दरेकर म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलारांनी (Ashish Shelar) पलटवार केला. आशिष शेलार म्हणाले, "'सकाळी आरएसएसचा जो कार्यक्रम झाला ती विचारांची श्रीमंती होती आणि संध्याकाळी जे झालं ते उसनवारी होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिशा देण्याचे काम केलं पाहिजे. पण त्यांची दिशा चुकल्याने षण्मुखानंद हॉलमध्ये दशावतार सुरु होता. समोर बसलेले शिट्ट्या मारतात की नाही हे बघत होते. ना विचार, ना धारा, ना धग असा हा शिवसेनेचा दसरा मेळावा. हा मेळावा म्हणजे वातानुकूलित उसनवारी होती, "
ठाकरेंना सचिन वाझेचा अभिमान का? भाजपचा सवाल
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल दसरा मेळाव्यात (shivsena dasara melava) भाजप आणि केंद्र सरकार यांना धारेवर धरले. स्वबळाचा नारा दिला. मराठी माणसाने भेदाभेद विसरावेत पण हिंदुत्वाचीही कास सोडू नये, असा सल्ला आजच्या दसरा मेळाव्यता दिला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जोरदार मांडणी केली. या भाषणावर मात्र, भाजपने टीका केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरेंच्या भाषणावरुन टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.