Local Governing Body : मिनी मंत्रालयातील संभाव्य बंड, कुण्या मंत्रानं ‘बाबा’ करणार थंड

Political Clash : ‘डीपीसी’त सामावून घेण्याच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक
Jilha Parishan Gondia and Dharmarao Baba Aatram
Jilha Parishan Gondia and Dharmarao Baba AatramGoogle
Published on
Updated on

Gondia Jilha Parishad News : गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीवर गेल्या अनेक दिवसांपासून नियुक्ती न मिळाल्यानं जिल्हा परिषदेतील भाजपचा गट नाराज आहे. आता या गटानं जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिलाय. अलीकडेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धर्मराव बाबा आत्राम यांनी सूत्रं स्वीकारली. प्रशासनानं लक्ष न दिल्यास आता ‘बाबां’नाच एखादा उपाय करीत जिल्हा परिषदेतून होणारे संभाव्य बंड वेळीच थंड करण्यासाठी उतारा शोधावा लागणार आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात नुकतीच जिल्हा नियोजन मंडळाची बैठक (२७ ऑक्टोबर) पार पडली. अनेक नवीन कामांना या बैठकीत मान्यता मिळाली. मात्र, आता नियोजन समितीवरून जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यानी रणकंदन सुरू केलय. जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत सामावून घेण्यात यावं, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष (भाजप) पंकज रहांगडाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिलाय. (How minister Dharmarao Baba Atram from Gondia will resolve BJP Zilla Parishad president Pankaj Rahangdale's demand regarding DPC member selection)

गोंदिया जिल्हा नियोजन समितीत अध्यक्ष वगळून २० जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश असतो. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी लोटूनही जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत सामावून घेण्यास टाळाटाळ होत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत नेमणूक न मिळाल्यामुळं ग्रामीण क्षेत्रातील विकास कामावर प्रतिकूल परिणाम होतोय. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया तत्काळ सुरू करून जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत स्थान देण्यात यावं, अशी मागणी पंकज रहांगडाले यांनी केलीय. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं बोलण्याची सोयच नव्हती. परंतु आता ‘आपलं सरकार’ आल्यानं रहांगडाले यांनी प्रशासनाकडे रेटा सुरू केलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. यात योजनेचे नियोजन व कामे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत करण्यात येतात. या योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या अधीन राहुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समिती सभेची मंजुरी प्रदान करून योजनेनुसार कामाची अंतिम निवड यादी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीस्तव पाठविण्यात येते. यादीनुसार कामांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी प्रदान करणे अभिप्रेत आहे. स्थानिक स्वराज संस्थेतील जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत नेमणुकीसाठी संबधितांना योग्य निर्देश अविलंब निर्गमित करण्यात यावे. या तरतुदीचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला.

का आली निवेदन देण्याची वेळ?

जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या निदर्शनास जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीचा मुद्दा आणुन दिला होता. त्यावर पालकमंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही जिल्हा परिषद सदस्य निवडीचा मुद्दा मार्गी न लागल्यानं आता रहांगडाले आक्रमक झाले आहेत.

(Edited by : Prasannaa Jakate)

Jilha Parishan Gondia and Dharmarao Baba Aatram
Gondia : बारामतीत भूसुरुंग स्फोट; आत्रामांचे भाकीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com