देशमुखांचा राजीनामा घेतला ना, आता आदित्य आणि उद्धव ठाकरेंनीही राजीनामा द्यावा…

मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) राजीनामा देणार नसतील, पर्यावरण मंत्रीही (Aditya Thackeray) राजीनामा देणार नसतील, तर मग अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा कशाला घेतला?
chandrakant Patil on Uddhav Thackeray
chandrakant Patil on Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

भंडारा : सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, तो सर्व महाराष्ट्राला (Maharashtra) लाजवणारा व्यवहार चाललेला आहे आणि यामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष (BJP) स्वस्थ बसणार नाही. ज्या प्रकारे परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) आरोप केले आहेत. त्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री राजीनामा देणार नसतील, पर्यावरण मंत्रीही राजीनामा देणार नसतील, तर मग अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा कशाला घेतला, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विचारला.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा अपघातात मृत्यू झाला होता. रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी चंद्रकांत दादा आज तिरोड्याला आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. लोकांना निवडणुका येईपर्यंत थांबावे लागते, पण आम्ही नाही थांबू शकत नाही. कारण अनिल देशमुख यांच्यावरदेखील परमवीर सिंह यांनी आरोपच केले होते. त्यापुढे काही झाले नव्हते, चौकशी पुढे जायचीच होती आणि राजीनामा घेतला गेला. अन् आता तर अनिल देशमुखांना सर्वांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात भयंकर स्थिती आलेली आहे. एखाद्या टोळीचे राज्य आहे की काय, असे वाटू लागले आहे. या सरकारमधील एक मंत्री मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरतो म्हणून त्याला राजीनामा द्यावा लागतो. दुसरे एक मंत्री ज्यांनी राज्याची कायदा व सुव्यवस्था बघायची असते, तेच आज जेलमध्ये आहेत. त्यांना आपल्याच सहकाऱ्यांना दम द्यावा लागतो, की मी तोंड उघडले तर महागात पडेल. येवढ्यावरच किस्सा थांबत नाही तर त्यांना आता तोंड उघडायला सुरूवात केली आहे. तेच मंत्री परिवहन मंत्री अनिल परबांच्या बाबतीत म्हणतात की, ते मला पोलिसांच्या बदल्यांच्या बाबतीत ते मला चिठ्ठी आणून द्यायचे. राज्याचे मुख्य सचिव म्हणतात की, अनिल देशमुख मला चिठ्ठी आणून द्यायचे. परमबीर सिंह म्हणतात की, सचिन वाझेंची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आग्रह धरला होता. अन् तिकडे अनिल परबांच्या १०० कोटी रुपयांच्या रिसॉर्टला तोडण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची नोटीस निघते, अशा एक एक घटना सांगत, काय चाललंय काय महाराष्ट्रात असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

chandrakant Patil on Uddhav Thackeray
Video: ..तर राज्यच केंद्र सरकारला चालवायला द्या, चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका

अनिल देशमुख यांना आज कुणी भेटायलाही तयार नाही. अनिल देशमुखांची स्थिती बघून एक गोष्ट आठवली. एक माकडीन आपल्या पिल्लाला घेऊन जात असते. तेवढ्यात पूर येतो. मग ती माकडीन पिल्लाच्या नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून आधी कमरेवर घेते, मग खांद्यावर घेते आणि त्यानंतर डोक्यावर घेते. पण जेव्हा माकडीनीच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागते, तेव्हा ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी त्याला पायाखाली घेते. आज अनिल देशमुखांची स्थिती त्या माकडीनीच्या पिल्लासारखी झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या सरकारमध्ये सर्वत्र गडबड सुरू आहे. आता तर किराणा दुकानांतून वाईन विकण्याची परवानगी दिली आहे. हे होईल असे सरकारला वाटत आहे. पण वाईन विक्री सुरू होताच महिलांचे मोर्चे दुकानांवर आणि मंत्र्यांच्या घरांवर धडकतील, तेव्हा सरकारला माहिती पडेल. आता जनता जागली आहे. ‘कुर्सी खाली करो’, असे सरकारला म्हणण्याची वेळ आली आहे, असा घणाघात चंद्रकांत दादांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com