बुलडाणा : असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी होण्याची तयारी चालवली आहे. यावरून राज्यभर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर कडाडून टिका केली आहे. उद्या एमआयएम शिवसेनेसोबत आली, तर आश्चर्य वाटायला नको, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे.
शिवसेनेवर हल्ला चढवताना आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) म्हणाल्या, शिवसेनेचं (Shivsena) हिंदुत्व हे केवळ आणि केवळ अंगावरती चढवण्यापुरतंच राहिलेलं आहे. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेससोबत सत्तेत बसली, त्या दिवशीच त्यांनी हिंदुत्वाला लाथ मारली. गेल्या दोन वर्षांपासून एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना या सरकारकडून संरक्षण दिलं जात आहे, त्यांनाच योजना दिल्या जातात. परंतु ज्या हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब ठाकरे लढले, मोठे झाले, ते हिंदुत्व आताचे शिवसेना पक्षप्रमुख विसरलेले आहेत.
दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या लोकांसोबत यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने व्यवहार केलेले आहेत. हा देशद्रोह आहे. पण ठाकरे सरकार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याऐवजी त्याला संरक्षण देत आहे. नवाब मलिकांनी मुंबईत आणि शिवसेना भवनमध्येही बॉम्बब्लास्ट घडवून आणले आहेत आणि त्याच नवाब मलिकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे आलेले आहेत. ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. यापेक्षा वेगळं अजून काय पहायचं बाकी राहिलं आहे, असा सवाल आमदार महाले यांनी केला.
शिवसेनेचे हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, ते आता फक्त बोलण्यामध्ये दिसतं. त्यांच्या कृतीतून ते केव्हाच निघून गेलं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचं हिंदुत्वही निघून गेलं आहे. त्यामुळे आज चर्चा सुरू आहे, पण उद्या एमआयएम पक्ष शिवसेनेसोबत आला, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही, असेही आमदार महाले म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.