Uddhav Thackeray News : बाबरी पाडायला शिवसेना नव्हती तर तुमचे काका गेले होते का?; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

State Government and Hindutva : राज्य सरकारचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : "बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ सुरू झाली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. बाबरी पाडण्यात शिवसेना नव्हती मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेला होतात का? शिवसेना प्रमुखाविरोधात भाजपचे नेते अशी वक्तव्य करतात हे सरसंघचालकांना हे पटते का? मी माझ्या बापाचे नाव घेऊन येतो तुम्ही पण या. जनता निर्णय घेईन", असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Jayant Patil : ''कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता...'' जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नागपूर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्र सरकारवरही सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांही हिशेब मागण्याची वेळ आल्याचे म्हटले.

ठाकरे म्हणाले, "व्यसन हे माणसाला जीवनातून उठविते. मात्र सत्तेची लागलेली नशा ही देशाचा नाश करते. सध्या लोकशाही संविण्याचे कारस्थान सुरू आहे. लोकशाहीच्या माध्यमातून मिळविलेल्या सत्तेचा वापर जनतेला कामी आणि सत्ताधाऱ्यांच्या मित्रांनाच जास्त होत आहे. जागतिक क्रमवारीत देशाचा विकासाचा दर घसरत असताना सत्ताधाऱ्यांच्या मित्रांचा श्रीमंतांच्या यादीतील क्रम वर जात आहे. दरम्यान, नागपूरमध्ये येणारी एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यामुळे देशासाठी पंतप्रधानांनी आठ वर्षात काय केले ही आता विचारण्याची वेळ आली आहे."

Uddhav Thackeray
BRS News : राष्ट्रवादीला मराठवाड्यात पुन्हा दे धक्का ; माने पिता-पुत्रांचा बीआरएसमध्ये प्रवेश..

राज्यातील अवकाळी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या राज्यात ईडीच्या आशिर्वादने अवकाळी सरकार (State Government) आले आहे. राज्यात अवकाळी पावसाने धूडगूस घातला असताना शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाचे संकट होते. मात्र वादळांमुळे झालेली नुकसान भरपाईसाठी सरकाने वेगाने पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला."

Uddhav Thackeray
Nitin Deshmukh : पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेला तोटाच; नितीन देशमुखांनी मांडलं गणित

शिवसेनेत (Shivsena) फूट पाडून गेलेल्या लोकांना हिंदुत्वाची काही देणेघेणे नव्हते, अशी टीका ठाकरेंनी केली. ते म्हणाले, "हे रामभक्त असते तर ते सूरत किंवा गुवाहटीला गेले नसते. तर अयोध्येला गेले असते. उपमुख्यमंत्री हेही मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते अयोध्येला गेले नाहीत. आता एका पाठोपाठ गेले. इकडे राज्यात अवकाळीने शेतकरी त्रस्त असताने ते देवदर्शनाला गेले. अशाने रामराज्य येत नसते."

सध्या लोकशाही मोडीत काढण्याचे काम केले जात असल्याची टीका ठाकरेंनी केली. ते म्हणाले, "नागपूरमध्ये (Nagpur) बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. सध्या भारतमातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरू झाले. लोकशाहीने देश चालविण्यासाठी एका माणसाने संविधान दिली. त्याचे रक्षण आपण करू शकत नाही का? त्यामुळे आता घटना बचाव नाही तर घटनेचे रक्षण मीच करणार, असे म्हणावे लागणार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com