Jayant Patil : ''कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता...'' जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Nagpur News : नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
Jayant Patil News
Jayant Patil NewsSarkarnama

Jayant Patil News : या सरकारने महाराष्ट्राला सुडाचे राजकारण दिले. मागच्या वर्षभरात सुडाचे राजकारण सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्या-आल्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील सर्व कामांना स्थगिती दिली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला.

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा होत आहे. या सभेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. जयंत पाटील म्हणाले, पहिला सभा, ही छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. दुसरी सभा नागपुरमध्ये होत आहे. नागपूर हे भारताचे मध्य केंद्र आहे. इंदिरा गांधी यांना देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी याच विदर्भाने साथ दिली. विदर्भाचा निर्णय देशात पोहोचतो, असेही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil News
Anil Deshmukh News : '१४ महिने जेलचा भत्ता खाल्लोय, कुणी माय का लाल अनिल देशमुखला रोखू शकत नाय,' ; सत्ताधाऱ्यांना खुला इशारा!

विदर्भाने निर्णय केला की तो देशाचा निर्णय होतो. आमची वज्रमूठ ही शेतकऱ्यांची आहे. या सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांना काय दिले. कोणते नवीन प्रकल्प आणले. विदर्भासाठी कोणते निर्णय घेतले जणे करुन नागरिकांना वाटेल की आपला नेता या सरकारमध्ये काम करतो, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला. या सरकारने महाराष्ट्राला सुडाचे राजकारण दिले. मागच्या वर्षभरात राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. सत्तेत आल्या-आल्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील सर्व कामांना स्थगिती दिली. आम्ही न्यायालयात गेलो तरी सुद्धा सरकारने कामांवरील स्थगिती उठवली नाही. प्रकल्प गेले तर त्या उद्योग पतींकडे जाण्याचे धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना झाले नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्राला एक वेगळी प्रतिभा आहे. तरुणांनी काही गाणे केली त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम या सरकारने केले. आपल्या विरोधात जे बोलतात त्याला नोटीस द्यायची, या पलिकडे या सरकारने काही काम केलेले दिसत नाही. महाराष्ट्राने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आपमान सहन केला नाही. मात्र, भाजपने नेमलेल्या राज्यपालांनी छत्रपतींचा आपमान केला होता. हे सरकार बहुजणांचे नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

Jayant Patil News
Mahavikas Aghadi Sabha : शिवरायांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम १० महिन्यांपूर्वी झाले : सुनील केदारांचा शिवसेना बंडखोरांवर हल्लाबोल

हे सरकार निवडणुकांना घाबरत आहे. त्यामुळे निवडणुका घेत नाहीत. महाराष्ट्र सरकारला वाटत असेल की आपण जणतेत लोकप्रिय आहेत, तर त्यांनी निवडणुका घ्याव्या. आता फक्त इव्हेंट मॅनेजमेंट काम सुरु आहे. ज्या ठिकाणी लोक जमतात तेथे जाऊन उभे राहयचे, असा टोला पाटील यांनी लगावला.

कुछ तो मजबुरीया रही होगी. युव तो कोई बेईमान नही होता, काहीतरी नस दाबली असेल, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. सर्व महाराष्ट्रातील शिवसैनीक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. नऊ वर्ष केंद्रात सरकार आहे. आमचा देश अध्यक्ष महोदय, असे जयंत पाटील म्हणाले त्यावर एकच हशा पिकला. देशाची अधोगती झाली आहे. देशात विरोधकांना शत्रू माण्याचे काम सुरु झाले आहे. आपण सगळ्यांनी ही वज्रमूठ एकत्रीत केली पाहिजे. नागपुरात एक तास पाणी मिळते. नागपुरचा विकास होत नसेल तर महाराष्ट्राचा विकास कसा होईल, असा सवाल त्यांनी केला. आमच्या वज्रमुठीला नाव ठेवतात. त्यांना याची भिती आहे की हे एकत्र राहिले तर आपल्याला सत्ता मिळणार नाही, त्यामुळे ते म्हणतात वज्रमुठीला तडा गेला आहे, असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com