BRS News : राष्ट्रवादीला मराठवाड्यात पुन्हा दे धक्का ; माने पिता-पुत्रांचा बीआरएसमध्ये प्रवेश..

Ncp : माने पिता-पुत्रांच्या पक्ष प्रवेशाने गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.
Ncp Officials Join BRS News
Ncp Officials Join BRS NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) (BRS) पक्षाने मराठवाड्यात राष्ट्रवादीला एकावर एक धक्के देणे सुरू केले आहे. आधी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, त्यांचे पुत्र, वैजापूरचे अभय पाटील चिकटगांवकर, कदीर मौलाना यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर आता गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे पुत्र संतोष माने यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.

Ncp Officials Join BRS News
BRS Rally News : छत्रपती संभाजीनगरातील केसीआर यांच्या सभेसाठी मैदानाची पाहणी...

हैदराबाद येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांची भेट घेत त्यांनी पक्षात प्रवेश केला. (Ncp) आता २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या केसीआर यांच्या सभेत पुन्हा त्यांचा भव्य-दिव्य असा प्रवेश केला जाणार आहे. अण्णासाहेब माने हे शिवसेनेच्या तिकीटावर गंगापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते.

तर त्यांचे चिरंजीव संतोष माने यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. (Marathwada) मात्र त्यांच्या भाजपच्या प्रशांत बंब यांनी पराभव केला. गेल्या दोन महिन्यापासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम बीआरएसमध्ये प्रेवश केला. त्यानंतर राष्ट्रवादीसह मनसे, शेतकरी संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत बीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

माने पिता-पुत्रांच्या पक्ष प्रवेशाने गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यांना भारत राष्ट्र समिती पक्षात आणण्यासाठी महाराष्ट्राचे पक्ष निरीक्षक जीवन अण्णा रेड्डी, मौलाना अब्दुल कदिर, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, अभय पाटील चिकटगावकर, प्रवीण अण्णा जेठेवाड यांनी मदत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com