Important Statement of NCP Leader Ajit Pawar : सुप्रीम कोर्टाकडून शिंदे-फडणवीस सरकारला हिरवा कंदील मिळाल्यानंतर राजकीय पक्षांनी आगामी मनपा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे.
अनेक राजकीय पक्षांचे नेते हे महानगरपालिकांमध्ये जाऊन तिथे आढावा बैठक घेत आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. आज (ता. ४) सकाळी नागपुरात अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, "मुंबईतील लोकांना ठाकरे गटाबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढण्याबाबतची ठाकरेंसोबत चर्चा करणार आहे,"
"मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खूप काही ताकद नाही. आमचे कमी आमदार या ठिकाणी निवडून येतात, नगरसेवक ही कमीच निवडून येतात. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना एकत्र सामोरे जाऊ, अशी विनंती केली आहे," असे अजित पवार यांनी सांगितले.
"नुकत्यात झालेल्या एका पाहणीत शिवसेनेला (ठाकरे गटाला) जागा जास्त दाखवत आहे. मुंबईतल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे. उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर का ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली तर याचा फायदा त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटासोबतच आपली आघाडी करणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे," असे अजित पवार म्हणाले.
ते म्हणाले, "२००४चा अपवाद वगळता ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री असतो, त्या घटनेला आता १९ वर्षे झालेले आहेत. त्यावेळी जागा जास्त आल्यावरसुद्धा आम्ही मुख्यमंत्रिपद न घेता, चार मंत्रिपद अधिक घेतले होते,"
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.