Imtiyaz Jaleel : 'त्या' नेत्याच्या काळजीपोटी आंबेडकर आणि इम्तियाज जलिल यांचे एकमत

imtiyaz jaleel ask take care manoj jarange patil : पोलिसांनी विशेष दक्षता घेण्याची मागणी केली
Imtiyaz Jaleel
Imtiyaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Imtiyaz Jaleel : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नसल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही चिंतेची बाब असून पोलिसांनी यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आताच्या राजकारणात काहीही होऊ शकतं असेही जलील म्हणाले. खासदार इम्तियाज जलील आज (ता. 18) अकोला दौऱ्यावर असतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे यांच्या विषयी प्रकाश आंबेडकर हे बोलले असतील तर नक्कीच याबाबत त्यांच्या कडे काही इनपुट असतील. त्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांची काळजी घ्यावी, असेही जलील म्हणाले. दरम्यान इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. तर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देणार यावर बोलताना जलील म्हणाले की, याबाबतचा निर्णय असुदुद्दीन ओवेसी घेतील आणि तेच माहिती देतील. मात्र प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत किती जागा मिळतील हे अजुन ठरलं नाही. यावर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी लवकर निर्णय घ्यावा असेही जलील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Imtiyaz Jaleel
Rohit Pawar : 'मलिदा गँग'कडून नोकऱ्या घालवण्याच्या धमक्या; रोहित पवारांचा रोख कुणाकडे?

राज्यात सध्या सर्वात घाणेरडे राजकारण सुरू असून एकतर जेल मध्ये जा नाहीतर भाजप मध्ये जा अस सध्या सुरू आहे. अनेकजण आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणतात. मात्र जे म्हणत होते तेच आज भाजपमध्ये जात आहेत. अशोक चव्हाण यांनी एमआयएम ला भाजपची बी टीम म्हटलं होत. आज तेच भाजपमध्ये गेले आहेत. अशोक चव्हाणांसारखे लोक सुरुवातीपासून आरएसएससी संबंधित आहेत, फक्त सेक्युलरीझमचा बुरखा घालून लोकांचा राजकारणासाठी वापर करत आहे. तर कमलनाथ हे आज भाजपच्या वाटेवर असल्याचे जलील म्हणाले. कुणाबरोबर युती करणार का यावरही जलील यांनी भाष्य करीत आमच्या पक्षासोबत कोणीही येण्यास तयार नाही. आम्ही अछूट असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. मात्र आम्ही भाजपसोबत असलेल्या पक्षांपासून दूर असल्याचे जलील म्हणाले.

आम्ही संभाजीनगर या नावाला विरोध करीत आहे. म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध करीत आहे असे नाही. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र आज या महापुरुषांच्या नावावर राजकारण होत आहे. म्हणून त्यांनी अर्धारात्री सर्वच ठिकाणी संभाजीनगर नामकरण केले. आम्ही कोर्टाला मानत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. कधीही निकाल येऊ शकतो असेही जलील म्हणाले.राज्यात किती जागा एमआयएम लढणार हे असुदुद्दीन ओवेसी ठरवतील. मात्र आम्ही मुंबईची जागा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे जलील म्हणाले. कारण वीस वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या लोकांना उद्ध्वस्त करण्यात आलं. राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांनी बुलडोझर चालवले गेले. गोर-गरिबांवर अत्याचार होतो. बुलडोझर चालवला जातो असाही आरोप जलील यांनी केला.

Edited By Sachin Deshpande

Imtiyaz Jaleel
NCP MLA Disqualification Case : अजित पवारांना नागालँडमध्येही मोठा दिलासा; शरद पवारांना तिथेही धक्का...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com