Baramati Political News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बारामतीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आणि ज्येष्ठ नेते शरद पवार गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. बारामतीकरांना दोन्ही गटांकडून भावनिक साद घातली जात आहे. यातच आमदार पवारांनी ट्विट करून धक्कादायक माहिती दिली आहे. विरोधात बोलले की मलिदा गँगकडून रोजगार घालवण्याची धमकी देत असल्याचा आरोपच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
आपल्या ट्विटर हँडलवर रोहित पवारांनी ट्विट करून नाव न घेता अजित पवार (Ajit Pawar) गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाजूने कुणी बोलले तर त्यांना नोकरीवरून काढण्याचा आणि त्यांच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग सुरू आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी रोहित पवारांनी अजित पवार गटाचा मलिदा गँग असा उल्लेख केला आहे. कुणी टीका केली म्हणून आजवर कधीही कुणाची नोकरी गेली नाही. त्यांनी धमकी दिलेली नाही. असे प्रकार यंदाच घडत आहेत. विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात आहेत. असे असेल अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे. हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावे, असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अजित पवारांनीही समोरुन भावनिक आवाहन केले जाईल, पण त्याला भुलू नका, म्हणत मी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन केले आहे. यातच बारामतीकरांना रोजगार घालवण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. परिणामी बारामतीतील वातावरण तापण्याची शक्यात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.