IPS officers vs public representatives
IPS officers vs public representativessarkarnama

Narendra Bhondekar : लोकप्रतिनिधी विरुद्ध IPS वाद तापला? सनदी अधिकाऱ्यांना इशारा देत शिंदेंचा शिलेदार भडकला, मुख्य सचिवांच्या समक्ष बोलावली बैठक

IPS officers vs public representatives : राज्यातील काही आयपीएस अधिकारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत असा सूर गेल्या काही दिवसापासून घुमू लागला आहे. याचे पडसादही आता नागपुरमध्ये उमटू लागले आहेत.
Published on
Summary
  1. विशेषाधिकार समितीचे प्रमुख भोंडेकर यांनी आयपीएस अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचे ऐकत नसल्याचा आरोप केला.

  2. विधानसभेत या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधान आले आहे.

  3. भोंडेकर यांच्या संतापामुळे IPS अधिकारी विरुद्ध लोकप्रतिनिधी वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

Nagpur News : आयपीएस अधिकाऱ्यांकडून आमदारांना मानसन्मान दिला जात नसल्याने भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार आणि विशेष अधिकार समितीचे प्रमुख नरेद्र भोंडेकर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी थेट सनदी अधिकाऱ्यांना इशारा दिला असून मुख्य सचिव यांच्या समक्ष अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामुळे सध्या राज्यात लोकप्रतिनिधी विरूद्ध सनदी अधिकारी असा वाद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.

विशेषाधिकार समिती आमदाराच्या हक्क, अधिकारासाठी काम करते. समितीचा प्रमुख या नात्याने अनेक आमदारांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना पाहिजे तसा सन्मान दिला जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये खासकरून आयपीएस अधिकारी ऐकत नाहीत अशा बहुतांश आमदारांच्या तक्रारी आहेत.

समितीचा प्रमुख या नात्याने याची दखल घेऊन पुढच्या आठवड्यात एक आढावा बैठक बोलावण्यात आली असल्याचे नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. बुधवारी (ता.17) समितीची अंतर्गत बैठक होणार असून पुढच्या आठवड्यात मुख्य सचिव यांच्या समक्ष अधिकाऱ्यांची बैठक होईल. यावेळी पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. गरज भासल्यास जिल्हा स्तरावरसुद्धा बैठका घेऊ असाही इशारा भोंडेकर यांनी दिला आहे.

IPS officers vs public representatives
Narendra Bhondekar : मला मंत्री का केले नाही? एकनाथ शिंदेंसमोरच चढला होता आमदार भोंडेकरांचा पारा...

शिवसैनिक असलेले आमदार भोंडेकर नेहमीच धाडसी निर्णय घेत असतात. त्यामुळे वादही उद्भवत असतात. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतही त्यांचे नेहमीच खटके उडत असतात. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केली नाही असा आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. या सभेतही युतीचे स्थानिक नेते उपस्थित नव्हते.

भंडारा दूध संघाच्या निवडणुकीत त्यांना नाना पटोले यांच्या पॅनेलसोबत आघाडी केली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भंडारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक मात्र ते महायुतीच्या पॅनेलसोबत होते. भंडारा जिल्ह्यात लुडबुड करीत असल्याने त्यांचे आणि भाजप आमदारांचे नेहमीच खटके उडत असतात.

पूर्व विदर्भाचे समन्वयक नेमल्यानंतर त्यांनी केलेल्या नियुक्तींवरून शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही त्यांचा वाद झाला होता. त्यांच्या नियुक्त्यांचे प्रकरणात शिवसेनेचे नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांना हस्तक्षेप करवा लागला होता. मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विशेषाधिकार समितीचे प्रमुख करून त्यांची नाराजी शिवसेनेला दूर करावी लागली. असे असले तरी भंडारा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांचा निवडून येऊन आपली ताकद दाखवली.

IPS officers vs public representatives
Parinay Fuke Vs Narendra Bhondekar : भोंडेकर-पटोलेंची युती 'भाजप'ला खटकली; विधानसभेतील मदतीची आठवण करून देत काढले वाभाडे

FAQs :

प्र.1: भोंडेकर यांनी नेमका कोणता आरोप केला?
उ.1: आयपीएस अधिकारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत असा गंभीर आरोप त्यांनी केला.

प्र.2: हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
उ.2: हे विधान विधानसभेतील चर्चेदरम्यान करण्यात आले.

प्र.3: यामुळे काय परिणाम झाला?
उ.3: विधानसभेत आणि राजकारणात या वक्तव्यामुळे खळबळ उडाली.

प्र.4: भोंडेकर कोण आहेत?
उ.4: ते महाराष्ट्र विधानसभेतील विशेषाधिकार समितीचे प्रमुख आहेत.

प्र.5: या प्रकरणाचा पुढील टप्पा काय असू शकतो?
उ.5: समितीमार्फत IPS अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com