Rahul Gandhi : तीन गांधींनी बघितलेली वाडेगावची जागेश्वर शाळा...

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव शाळेने आतापर्यंत तीन गांधी बघितले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या नंतर आज ही शाळा राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांच्या स्पर्शाने पुनीत झाली.
Rahul Gandhi at Akola
Rahul Gandhi at AkolaSarkarnama
Published on
Updated on

वाडेगाव (जि. अकोला) : कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विदर्भातून जात आहे. आज ही यात्रा अकोला (Akola) जिल्ह्यात आहे. वाडेगाव येथे यात्रेचा थांबा होता. जेथे हा थांबा होता, ते वाडेगाव महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने १९३३ साली पावन झाले होते त्यानंतर आज राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान येथेच थांबा घेतला होता.

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव शाळेने आतापर्यंत तीन गांधी बघितले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या नंतर आज ही शाळा राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांच्या स्पर्शाने पुनीत झाली. काँग्रेसचे (Congress) माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांची ही शाळा आहे. ते बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. आज ते 76 वर्षांचे आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जागेश्वर शाळे समोरून आज गेली. याच शाळेत यात्रेतील यात्रेकरूंच्या जेवणाची आणि आरामाची व्यवस्था करण्यात आली होती. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांच्या विरोधात यात्रा काढली होती.

त्यावेळी शाळेच्या शेजारी असलेल्या जागेश्वर धाम नदीच्या पात्रात त्यांनी सभा घेतली होती. त्या वेळी महात्मा गांधी यांनी शाळेला भेट दिली होती. महात्मा गांधींनी सभा घेतली होती ती तारीख होती १८ नोव्हेंबर १९३३. तर आज राहुल गांधी १७ नोव्हेंबर २०२२ ला येथे आले. राहुल गांधी यांच्या यात्रेत याच शाळेतून तुषार गांधी सहभागी झाले आहेत. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या सुद्धा आहेत.

Rahul Gandhi at Akola
Congress; पाच हजार नाशिककरांची राहुल गांधींना साथ

स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी महात्मा गांधी आले होते. आज भारत जोडो यात्रेसाठी त्यांचे नातू तुषार आणि जवाहरलाल नेहरू यांचे नातू राहुल गांधी वाडेगाव येथे येऊन गेले. एका काँग्रेस कार्यकर्त्यासाठी यापेक्षा आनंदाची दुसरी बाब काय होऊ शकते, आपल्यासाठी ही अत्यंत भाग्याची बाब असल्याचे लक्ष्मणराव तायडे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com