

Issues of changing the state president in NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ओबीसी असावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरवण्याची चर्चा सुरू झाली. (Under adverse conditions, Jayant Patil started fighting)
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कदाचित भाकरी फिरवली जाईलही, पण त्याआधी २०१८चा तो काळ पक्षाला आठवावा लागेल. असे राष्ट्रवादीतील जयंत पाटील यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. २०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे मोठमोठे नेते पक्ष सोडून गेले. अनेक दिग्गज मंडळींनी पक्षाला रामराम केला होता. त्या काळात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली होती.
कुत्सितपणे हसत 'राष्ट्रवादी संपली' बोलणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत होती आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत पाटलांनी लढा सुरू केला. आव्हानात्मक घडीला पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली. निवडणूक जवळ येत होती. विरोधक राष्ट्रवादीला हिणवत होते. पण जयंत पाटील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पिंजून काढून पक्षाचे माणसं एकत्र आणत होते. अपार कष्ट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले आणि पक्ष सत्तेत आला.
प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षात आणि २०१८-१९ या काळात केलेले काम उल्लेखनीय आहे. पक्ष सत्तेत आल्यानंतर पुन्हा त्यांनी धडाडीने पक्षबांधणी सुरू केली. विदर्भातील (Vidarbha) गडचिरोलीपासून सुरू केलेली परिवार संवाद यात्रा माईलस्टोन ठरली. अनेक तालुक्यांमध्ये भेटी देत ते थेट कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. निरसन केले.
कार्यकर्ते आपल्या समस्या मांडायचे, चिडायचे, हक्काने प्रश्न विचारायचे. पण या दरम्यान शांत, संयमी स्वभावाचे पाटील कधीच चिडले नाहीत. अरेरावी नाही की उगाच भडक आक्रमकता नाही. हसत हसत त्यांनी लोक जोडली. जयंत पाटलांनी सुरू केलेले पक्षप्रवेश, बूथ कमिट्या मजबुतीकरण एक तास राष्ट्रवादीसाठी (NCP) यांसारखे अनेक उपक्रम आजतागायत सुरू आहेत.
आज पक्षात भाकरी फिरविण्याची भाषा होते आहे. परंतु पक्षात भाकरी फिरविण्याआधी जयंत पाटलांनी (Jayant Patil) पडत्या काळात पक्षाला जी उभारी दिली, त्या योगदानाचा विचार पक्षाला करावा लागेल, असे जयंत त्यांचे समर्थक म्हणतात.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.