
जोगेंद्र कवाडे यांना कार्यक्रमात ‘मुर्दाबाद’च्या घोषणांचा सामना करावा लागला.
लोकांच्या प्रचंड संतापामुळे त्यांना कार्यक्रम सोडून जावे लागले.
भाजप महायुतीसोबत असल्याने लोकांनी त्यांचा जोरदार विरोध केला.
Nagpur News : लाँग मार्चचे प्रणेते, माजी आमदार तसेच पीपल्स रिपबल्किन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना आज अक्षरशः लोकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे कार्यक्रम सोडून जावे लागले. ते भाषणाला उभे होताच त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. कवाडे यांचा पक्ष सध्या भाजप महायुतीसोबत असल्याने त्यांचा विरोध करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील माहिती देशभरातील बौद्ध समाजापर्यंत पोचवण्यासाठी शनिवारी (ता.16) रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात कवाडे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबोधी विहार आंदोलनाचे अग्रणी भंते विनयाचार्य तसेच भगवान बुद्ध यांची भूमिका साकारणारे अभिनेते हिमांशू सोनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात बीटी ॲक्ट 1949 रद्द करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. भंते विनाचार्य हा ठराव मांडणार असून, भारतीय भिक्षसंघाचे भंते रेवत संघनायक, भंते उपगुप्त, भीमराव आंबेडकर, भदंत ज्ञानज्योती, भंते हर्षबोधी यावेळी उपस्थित होते. बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्राध्यापक कवाडे हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना आपले मत मांडण्यासाठी आयोजकांनी त्यांना मंचावर आमंत्रित केले. माईक हाती धरताच सभागृहातील प्रेक्षकांनी कवाडे यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात झाली. गोंधळाकडे दुर्लक्ष करून कवाडे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मी भाषणासाठी येथे आलो नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र गोंधळ आणखीच वाढला. घोषणाबाजीला जोर आला. अनेकांनी मुर्दाबादच्या घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे कवाडे यांना बोलताही आले नाही. लोकांचा विरोध बघून त्यांना सभागृह सोडावे लागले.
प्राध्यापक कवाडे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी लाँग मार्च काढला होता. या मार्चच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे झाले होते. शेवटी तत्कालीन सरकाराला याची दखल घ्यावी लागली. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे लागले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती.
भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी आंदोलन पेटल्यानंतर सरकारचा निषेध म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पीरिपाने शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे महायुती सरकारमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
प्र.1: जोगेंद्र कवाडे कार्यक्रमातून का बाहेर पडले?
उ.1: प्रचंड घोषणाबाजी आणि विरोधामुळे त्यांना कार्यक्रम सोडावा लागला.
प्र.2: लोकांनी त्यांचा विरोध का केला?
उ.2: भाजप महायुतीसोबत असल्यामुळे संतप्त जनतेने विरोध दर्शवला.
प्र.3: कवाडे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत?
उ.3: ते पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) चे संस्थापक अध्यक्ष आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.