Sameer Umap : अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात आता फलकावरून वाद!

Katol Assembly Sameer Umap anil Deshmukh : काटोला मतदारसंघात समीर उमप यांनी रस्ते व पुलाच्य बांधकामासाठी 64 कोटी रुपये मंजूर केल्याने मोठा फलका लावला आहे. मात्र, बॅनरवरील उमप यांचा फोटो विद्रुप करण्यात आला आहे.
 Sameer Umap anil Deshmukh
Sameer Umap anil Deshmukh sarkarnama
Published on
Updated on

Sameer Umap News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पेनड्राईव्ह वरून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात सलील आणि आशिष देशमुख या चुलत भावांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वॉर आणि उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू असताना भाजप नेत्यांच्या अभिनंदनाच्या फलाकास विद्रूप केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दुसऱ्या फळीतील राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘सतरंजी' संघटनेचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी रस्ते व पुलाच्य बांधकामासाठी 64 कोटी रुपये मंजूर केल्याने मोठा फलका मतदारसंघात लावला आहे. मात्र, बॅनरवरील उमप यांचा फोटो विद्रूप करण्यात आला आहे. फोटो विरोधकांनी विद्रुप केल्याचा आरोप उपम यांनी केला आहे.

या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर यांचे फोटे लावले आहेत. सौजन्य म्हणून समीर उमप यांचा या फलकावर फोटो आहे.

 Sameer Umap anil Deshmukh
Babajani Durrani : बाबाजानी दुर्राणींनी 'तुतारी' हाती घेताच अजितदादांच्या पक्षाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना...

आमचे लोकप्रतिनिधी मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष देत नाही. काहीच कामे करीत नाही. अनेक वर्षे सरकारमध्ये आणि मंत्रिमंडळात असतानाही मतदारसंघाचा विकास करून शकले नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती. महायुती सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणीची दखल घेतली.

त्यानुसार मतदारसंघाच्या विकासासाठी ६४ कोटी रुपये दिले. त्याकरिता आभार व्यक्त करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात अभिनंदनाचे बॅनर, पोस्टर लावले आहेत. मात्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते रुचले नाही. त्यामुळे माझा फोटो विद्रुप केल्याचे समीर उमप यांचे म्हणणे आहे.

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही उमप यांनी दिला आहे. सतरंजी संघटनेत सर्व पक्षाचे राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यांचा विरोध अनिल देशमुख यांना आहे. त्यांच्या विरोधात उभ्या राहणार उमेदवाराला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजपने संघटनेने आपसात ठरवून एका उमेदवाराचे नाव द्या असे त्यांना सांगितले आहे. भाजपचा उमेदवार ठरायचा असला तरी आतापासूनच यासाठी स्पर्धा सुरू आहे.

(Edited by Roshan More)

 Sameer Umap anil Deshmukh
Sanjana Ghadi News : उद्धव यांच्या वाढदिनीच खोचक ट्विट; शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्यांना ठाकरे गटानं झापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com