Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांच्या मताधिक्याची काँग्रेसकडून दखल, विधानसभेला वचपा काढणार?

Katol-Narkhed Assembly Constituency : काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केवळ 5 हजारांचं मताधिक्य मिळाल्याने राज्याचे माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे.
Former Home Minister Anil Deshmukh
Former Home Minister Anil DeshmukhSarkarnama

Former Home Minister Anil Deshmukh : महायुतीच्या विरोधात प्रचंड असंतोष, आयात केलेल्या उमेदवारांवर नाराजी आणि शिंदे सेनेचे फारसे अस्तित्व नसताना काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केवळ ५ हजारांचं मताधिक्य मिळाल्याने राज्याचे माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे. शिवाय आता याची नोंद काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली असून याचा हिशेब विधासनभेला चुकता केला जाईल असं बोललं जात आहे.

विशेष बाब म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) यांना सरासरी 15 ते 20 हजार मतांचे मताधिक्य आहे.

मात्र, देशमुखांचा मतदारसंघ याला अपवाद ठरला. भाजपचे आमदार असलेल्या हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघातून 20 आणि साडेसतरा हजाराचे मताधिक्य महविकास आघाडीला आहे.

देशमुख (Anil Deshmukh) हे सातत्याने काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. 2014 मध्ये त्यांना पुतण्याने पराभूत केलं होतं. हा त्यांच्या 20 वर्षांच्या कार्यकाळातील एकमेव अपवाद आहे.

1995 पासून ते सातत्याने मंत्रिमंडळात आहेत. अलीकडच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते दोन वर्षे गृहमंत्री होते. ईडीमुळे त्यांना वर्षभर कोठडीत राहवे लागले. याचा रोषही मतदारांमध्ये दिसत होता.

देशमुख यांनी घरोघरी जाऊन भाजपच्या नेत्यांनी आपल्याला कसं फसवलं याचं पत्रकही वाटलं होतं. युतीच्या विरोधात वातावरण असतानाही देशमुखांच्या मतदारसंघातून मताधिक्यात फारशी भर पडली नाही. ही बाब काँग्रेसच्याही (Congress) नजरेतून सुटली नाही. याची नोंद काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाचं म्हणजे, देशमुखांचा पराभव करणारा पुतण्या आशिष देशमुख हा पुन्हा भाजपमध्ये परतला आहे. तो पुन्हा काटोल-नरखेड विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची माहिती आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आशिष देशमुख यांना पूर्णवेळ याच मतदारसंघाची जबाबदारी भाजपने सोपवली होती. भाजपच्या ओबीसी सेलचे ते प्रदेश समन्वयक, प्रवक्ते आहेत.

Former Home Minister Anil Deshmukh
Supriya Sule : भविष्यात तुतारी की घड्याळ? सुप्रियाताईंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, "काही गोष्टी पोटात…"

लोकसभेच्या काळात त्यांना स्टारप्रचारक म्हणूणसुद्धा नियुक्त करण्यात आलं होतं. यापूर्वी काका-पुतण्यामध्ये अटीतटीचा समाना झाला होता. त्यानंतर भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांनीसुद्धा अनिल देशमुखांना चांगलेच झुंजविले होते.

अवघ्या हजारांच्या मतांच्या फरकाने देशमुख निवडूण आले होते. हे बघता लोकसभेतील महाविकास आघाडीचे पाच हजाराचे मताधिक्य भेदणे अवघड नसल्याचे मत या मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांचं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com