Supriya Sule : भविष्यात तुतारी की घड्याळ? सुप्रियाताईंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, "काही गोष्टी पोटात…"

NCP Sharad Pawar group What MP Supriya Sule said about party symbol : राज्यात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवून मिळालेल्या यश हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे शरद पवार गट भविष्यात घड्याळ या चिन्हासाठी पक्ष आग्रही राहणार का?
Supriya Sule On NCP Symbol
Supriya Sule On NCP SymbolSarkarnama

Pune News, 10 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात प्रचंड यश मिळालं आहे. राज्यात 10 पैकी आठ जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 80% स्ट्राइक रेट मिळवला आहे.

तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवून मिळालेल्या यश हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे शरद पवार गट भविष्यात घड्याळ या चिन्हासाठी पक्ष आग्रही राहणार का? तुतारी वाजणाऱ्या माणूस हे चिन्ह कायम ठेवणार याबाबतच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

बारामती (Baramati) लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, त्या म्हणाल्या, "राष्ट्रवादी हा पक्ष कोणाचा हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टाने ते तात्पुरते असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अध्याप पूर्णपणे त्यांचा झालेला नाही."

तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला महाराष्ट्रात मिळालेले यश पाहता पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह घेणे तुम्हाला परवडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात. त्यामुळे काही गोष्टी पोटात ठेवणंच योग्य असून पोटातलं ओठावरती येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

लोकसभेच्या विजयानंतर मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याचे समोर आलं आहे. याबाबत सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, "हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्यांच्या घरातलं मी का बघू, मात्र मला सांगावसं वाटतं की, राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा आघाडी सरकारमध्ये केंद्रात सत्तेत होतो. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शरद पवार यांच्यावरती विश्वास टाकत अडीच कॅबिन मंत्रालयाची त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती.

Supriya Sule On NCP Symbol
Supriya Sule On Ravindra Dhangekar : खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, रवींद्र धंगेकर 'कमबॅक' असे करतील की...'

तर प्रफुल्ल पटेल यांना स्वतंत्र पदभार देखील दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ-नऊ खासदारच होते. मात्र काँग्रेसने कधीही आकड्यांचा विचार केला नाही. त्यांनी मित्रपक्ष म्हणून नेहमीच आमचा मानसन्मान ठेवला आणि आम्हीदेखील त्यांचा मान ठेवला. मात्र भाजप मित्र पक्षांबरोबर कसं वागतो हे सगळ्यांना माहिती आहे," असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com