केसरकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार तर गायकवाड म्हणतात,ही तर आमचीच इच्छा

Sanjay Gaikwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आमच्याकडे भावना व्यक्त केली होती.
Deepak Kesarkar, Sanjay Gaikwad
Deepak Kesarkar, Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

बुलढाणा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन (Shivsena Dasara Melava 2022) वाद पेटला आहे. याबाबत शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (ता.२३ सप्टेंबर) न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळून लावत 'शिवतीर्था'वर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेल परवानगी दिली आहे.

दरम्यान, हा निकाल लागल्यावर शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा आम्हाला मार्ग मोकळा असल्याचे शिंदे गटाकडून मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले होते. मात्र आता शिंदे गटाच्या नेत्यांची भाषा बदलत चालली असून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) शिवसेनेचा मेळावा हा 'शिवतीर्था'वरच व्हावा ही आमची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही इच्छा होती. यामुळेच आम्ही जास्त विरोध केला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena Dasara Melava 2022 latest news)

Deepak Kesarkar, Sanjay Gaikwad
अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरणं म्हणाले,..मी गंमतीनं म्हणालो...

उच्च न्यायालयात निकाल हा शिवसेनेच्या बाजूने लागल्याने शिवसैनिकांकडून आणि नेत्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत उद्धव ठाकरे आणि अन्य पदाधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे. या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, आमचीही इच्छा तीच होती की शिवसेनेचा दसरा मेळावा हा 'शिवतीर्था'वरच व्हावा, तशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील आमच्याकडे व्यक्त केली होती. त्यामुळेच आम्ही त्यांना जास्त विरोध केला नाही. कारण बाळासाहेबांच स्मारक तिकडे आहे. तर आमचा मेळावा हा 'बिकेसी' संकुलात होईल. आमच्या मेळाव्यात बाळासाहेबांचे कडवट विचार ऐकायला मिळतील. जे की कुठेही मिळणार नाही, अशा शब्दात गायकवाडांनी आपले मत मांडले आहे. आता त्यांच्या या प्रतिक्रियेवर शिवसेनेच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Deepak Kesarkar, Sanjay Gaikwad
अजितदादांच्या मनात चाललंय, तरी काय?

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या वादासंदर्भातील शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणने एकूण घेत शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदानाची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्याभरातील शिवसैनिकांनी या निर्णयाचा आनंद व्यक्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com