Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे ठरेना, काँग्रेसचे ‘हे’ आमदार महायुतीकडून लढणार ?

Eknath Shinde : राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
Mahavikas  Aghadi - Mahayuti
Mahavikas Aghadi - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 Latest News : नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या गडावर चढाई कोण करणार, हे अद्यापही ठरलेले नाही. काँग्रेसच्या ‘संस्कृती’प्रमाणे उमेदवार कोण, याचा घोळ अद्याप कायम आहे. गटागटांतून वेगवेगळे नाव पुढे येत आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्येही स्थिती वेगळी नाही. पण सध्या सुरू असलेल्या घडामोडींनुसार विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह लागल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमरेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करून रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अद्याप महायुतीने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

राजू पारवे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे. त्यांना भाजपत जायचे आहे. अलीकडेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासोबत होते. असे असले तरी शिंदे सेना रामटेकवरचा दावा सोडायला तयार नाही. शिवसेनेचे कृपाल तुमाने या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत.

Mahavikas  Aghadi - Mahayuti
Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक जिल्हा परिषदेनंतर आता रश्मी बर्वे यांची दिल्ली गाठण्याची तयारी

भाजपचा तुमाने यांच्या उमेदवारीला विरोध आहे. रामटेकमध्ये भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. दोन आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला द्यावा, असा आग्रह धरला जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन करून हा मतदारसंघ भाजपसाठी (BJP) सोडावा, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी रामटेकवरचा दावा सोडला आहे. त्यामुळे आता येथे काँग्रेसचा उमेदवार लढणार, हे स्पष्ट झाले आहे.

या सर्व घडामोडी बघता आणि शिंदे सेनेचा आग्रह विचारात घेता राजू पारवे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असे जवळपास ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार आमदार पारवे यांनी महायुतीत सहभागी असलेल्या अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून निवडणुकीत मदतीची विनंती केली असल्याचे समजते.

दुसरीकडे मुंबईतील शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना फोन करून पारवे की तुमाने हवे, याची विचारणा केल्याचेही समजते. असे झाल्यास रामटेकमध्ये पुन्हा काँग्रेस (Congress) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा परंपरागत मुकाबला होण्याची शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

R

Mahavikas  Aghadi - Mahayuti
Lok Sabha Election 2024 : ठाकरे आणि कॉंग्रेस दोघेही रामटेक सोडण्यास तयार नाहीत, कसा निघणार तोडगा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com