Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींचे पैसे लाटणाऱ्या 'सरकारी नोकरदार' महिला रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा दणका!

Chandrakant Bawankule On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यात आला होता. महायुतीचे सरकार पुन्हा स्थानापन्न झाल्यानंतर या योजनेची शहानिशा करण्याचे ठरवण्यात आले. सुरुवातीला सरकारने कोणावर कारवाई करणार नाही, थकबाकी वसूल करणार नाही असे जाहीर केले होते.
CM Ladki Bahin scheme
CM Ladki Bahin schemeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 31 May : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यात आला होता. महायुतीचे सरकार पुन्हा स्थानापन्न झाल्यानंतर या योजनेची शहानिशा करण्याचे ठरवण्यात आले. सुरुवातीला सरकारने कोणावर कारवाई करणार नाही, थकबाकी वसूल करणार नाही असे जाहीर केले होते.

आता मात्र सरकारी नोकरीत असणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून वसूली केली जात आहे. शासकीय नोकरदार महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.

बावनकुळे म्हणाले, दीड हजार रुपये महिन्यासाठी सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी असे करायला नको होते. कोणी लाभ घेतला असले तर तो परत करायला हवा. शासनामार्फत वसुली केली जाणारच आहे. काही खात्यांनी याची चौकशी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना गोरगरीब बेरोजगार महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.

CM Ladki Bahin scheme
Thackeray brothers : महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार; महायुती अन् आघडीला मिळणार पर्याय! ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता किती?

यानंतरही शासकीय कर्मचारी याचा लाभ घेणार असले तर कारवाई निश्चित आहे असेही बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीचे निकष तीन हेक्टरवरून दोन हेक्टर करण्यात आल्याने महायुती सरकारवर आरोप केले जात आहे. निवडणुकीत फयदा घेण्यासाठी तीन हेक्टरची घोषणा केली होती काय अशी विचारणा केली जात आहे.

यावर चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचे निकषात समानता यावी. अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगून आपली सुटका करून घेतली. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान भरपाई करिता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला विषय हाच राहणार असल्याचे सांगितले आहे.

CM Ladki Bahin scheme
Andhare Vs Chakankar : 'रुपाली चाकणकर खोटं बोलू नका...', सुषमा अंधारेंनी सात पानांचा पुरावा दाखवला

गेल्या मंत्रिमंडळातही सविस्तर चर्चा नुकसान आणि मदतीवर झाली आहे. दहा हजार रुपये खावटी देण्याचे निर्णय घेतला आहे. पुढच्या कॅबिनेटच्या बैठकीपर्यंत संपूर्ण राज्यात किती नुकसान झाले याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेला नुकसान भरपाई लवकरच मिळेल असेही बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com