Bhandara : प्रतिष्ठेच्या गणेशपूर ग्रामपंचायत सरपंचाला अखेर व्हावे लागले पायउतार, कारण...

Corruption Charges : भ्रष्टाचार भोवला; विभागीय आयुक्तांनी दिले आदेश
Bhandara ZP
Bhandara ZPSarkarnama

Ganeshpur Gram Panchayat : भंडारा शहरालगतच्या गणेशपूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच विद्या मेहर अखेर पायउतार झाल्या आहेत. नागपूर विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या अपिलावर निर्णय घेऊन दोन दिवसांपूर्वी हा आदेश दिला आहे. सरपंच आणि सदस्यपदावरून त्यांना पुढील काळासाठी अपात्र घोषित केले आहे.

गणेशपूर येथील गोवर्धन साकुरे यांनी विद्या मेहर यांच्याविरुद्ध अपर आयुक्तांकडे अपिल केले होते. त्यात 2023-24 या वर्षाकरीता ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार न करणे, आमसभेत वेळेवर येणाऱ्या विषयांमध्ये नियमबाह्य ठराव घेणे, कोणत्याही विभागाची परवानगी न घेता शासकीय सुलभ शौचालय पाडणे, बोगस देयके जोडून बेकायदेशीर खर्च करणे आदी मुद्द्यांवर त्यांच्याविरुद्ध अपिल दाखल केले होते.

Bhandara ZP
Bhandara Crime : धक्कादायक! नईम शेखच्या हत्येनंतर आरोपी गेले राजकीय नेत्याच्या घरी

याप्रकरणी 8 जानेवारीला अंतीम सुनावणी घेण्यात आली होती. त्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचे वाचन करून सरपंच दोषी असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यामुळे तक्रारदार गोवर्धन साकुरे यांचा अर्ज मान्य करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विद्या मेहर यांना अपात्र घोषित केले होते.

अपात्रतेच्या या निर्णयाच्या आधार गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांनी उपसरपंच चितेश मेहर यांना सरपंचदाचा प्रभार देण्यासंदर्भात गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सचिवांच्या नावाने पत्र काढले. पत्रानुसार चितेश मेहर यांनी सरपंच म्हणून सूत्रे स्वीकारली. या संदर्भात विद्या मेहर यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा क्रमांक संपर्क क्षेत्राबाहेर होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा तालुक्यातील गणेशपूर ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. भंडारा शहराला लागून असल्याने शहराचाच एक भाग आहे. मागील वर्षभरापासून ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येथील मुद्दा उपस्थित झाल्यापासून राजकीय घडामोडी वेगाने वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्हा परिषदेच्या आमसभेमध्ये गणेशपूर ग्रामपंचायत भ्रष्टाचार चर्चेचा विषय ठरला होता. या विषयावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळही झाला होता.

ही बाब लक्षात घेता उचित कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. अखेर अपर आयुक्तांनी याबाबत आपला निर्णय दिलेला आहे. त्यामुळे गणेशपूर ग्रामपंचायतच्या सरपंचांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Bhandara ZP
Bhandara : कार्यकर्त्यांच्या कुपोषणाचा मुद्दा; महायुतीतून कोण देणार, याकडे लक्ष?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com