

Nagpur News: 246 नगरपरिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात नागपूर जिह्यातील एकूण 27 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमरेड विधानसभा मतदारसंघातील दोन स्थानिक स्वराज्य संस्थांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व निवडणुका भाजपचे आमदारांच्या मतदारसंघातच होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे सर्वाधिक टेन्शन भाजप (BJP) आमदारांनाच घ्यावे लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपला मोठा फटका बसला होता. विधानसभेत याची भरपाई भाजपने केली असली तरी शेतकऱ्यांचा सरकारवरचा रोष या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी, उमरेड, वाडी, काटोल, रामटेक, सावनेर, खापा, कळमेश्वर-ब्राम्हणी, नरखेड, मोहपा, मोवाड, वानाडोंगरी, बुटीबोरी, कन्हान-पिपरी, डिगडोह देवी अशा 15 नगर पालिका तर महादुला, मौदा, भिवापूर, बहादुरा, कांद्री-कन्हान, बिडगाव-तरोडी, बेसा-पिपळा, पारशिवनी, नीलडोह, कोंढाळी, गोंधनी रेल्वे, येरखेडा अशा एकूण 12 नगर पंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. यापैकी उमरेड नगरपालिका आणि भिवापूर नगर पंचायत ही काँग्रेसचे आमदार विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांच्या उमरेड मतदारसंघातील आहेत.
उर्वरित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आशिष देशमुख, काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर, हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि रामटेकचे शिवसेनेचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मतरसंघातील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने आमदारांना जातीने लक्ष घालावे लागणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपला मोठा फटका बसला होता. विधानसभेत मात्र भाजपने ही कसर भरून काढली होती. आता कार्यकर्ता नाराज होणार नाही याची दक्षता भाजपला घ्यावी लागणार आहे.
भाजपला सर्वाधिक धोका माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखडे विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातील आमदार आशिष जयस्वाल आणि चरणसिंग ठाकूर यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपकडे दोन माजी आमदार आहेत. दोन्ही पारवे यांचे आपसात पटत नसले तरी त्यांना आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी या निवडणुकीत पुढाकार घ्यावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.