Lok Sabha Election 2024 : अमरावतीत आंबेडकरांना धक्का; वंचितमध्ये फूट, जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा

Shailesh Gawai News : अमरावती मतदारसंघात गवई यांच्या पाठिंब्यामुळे आघाडीला मोठे बळ मिळाले असून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
Shailesh Gawai, Balwant Wankhade, Prakash Ambedkar
Shailesh Gawai, Balwant Wankhade, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : वंचित बहूजन आघाडीला अमरावती लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) मोठा धक्का बसला आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी आज मोठी घोषणा केली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आदेश धुडकावून लावत गवई यांनी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आघाडीची ताकद वाढणार आहे.

वंचितने (Vanchit Bahujan Aaghadi) अमरावतीत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना काही दिवसांपुर्वी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यावरून बरंच राजकारण (Politics) तापलं होतं. पण प्रचारामध्ये वंचित आणि रिपब्लिकन सेनेमध्ये समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून येते होते. गवई (Shailesh Gawai) यांनीच याबाबत आज मोठा दावा केला.

Shailesh Gawai, Balwant Wankhade, Prakash Ambedkar
Madha Lok Sabha 2024 : माढ्यातून अर्ज भरलेल्या लक्ष्मण हाकेंची शिवसेनेतून हकालपट्टी होणार; कोकीळ यांचे संकेत

मीडियाशी बोलताना गवई म्हणाले, रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगली वागणूक दिली जात नाही. सालगडी असल्याप्रमाणे वागवले जाते. अनेक दिवसांपासून आनंदराज आंबेडकरांसोबत आहोत. पण वंचितला घेऊन प्रचार करण्यासाठी कोणतेही नियोजन केले जात नाही. उलट आमच्याच पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समाजाचा माझ्यावर वाढता दबाव आहे. सर्वांच्या सोबत राहून मलाही राजकारण करायचे आहे. मतदारसंघात दुफळी निर्माण होऊ नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे गवई यांनी सांगितले.

मतांचे ध्रुवीकरण थांबवण्यासाठी तसेच इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आज मी महविकास आघाडीचे समाजातीलच सर्वसामान्य उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांना जाहीर पाठिंबा देत आहे. त्यांचा प्रचारही आम्ही करणार असल्याचे गवई यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमरावती मतदारसंघात गवई यांच्या पाठिंब्यामुळे आघाडीला मोठे बळ मिळाले असून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासमोर आव्हान असणार आहे. आता गवई यांच्या निर्णयानंतर वंचित किंवा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.   

Shailesh Gawai, Balwant Wankhade, Prakash Ambedkar
Girish Mahajan : भाजपा कार्यकर्त्यांचा प्रश्न, संकटमोचक गिरीश महाजन गेले तरी कुठे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com