Madha Lok Sabha 2024 : माढ्यातून अर्ज भरलेल्या लक्ष्मण हाकेंची शिवसेनेतून हकालपट्टी होणार; कोकीळ यांचे संकेत

shvsena Leader Laxman Hake News : येत्या दोन ते तीन दिवसांत लक्ष्मण हाके यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता शिवसेनेच्या पक्षांतर्गत वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी प्रा. हाके यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama

Solapur, 21 April : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेलेला असतानाही ठाकरेंच्या पक्षाच्या प्रवक्त्याने बंडखोरी केल्याने एकच चर्चा सुरू आहे. मात्र, प्रा. हाके यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे संकेत ठाकरे गटाचे नेते अनिल कोकीळ यांनी दिले आहेत.

प्रा. लक्ष्मण हाके यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Laxman Hake
Bhalke Group News : भालकेंना मंगळवेढ्यात धक्का; शिंंदेंना पाठिंबा दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपत प्रवेश

येत्या दोन ते तीन दिवसांत लक्ष्मण हाके यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता शिवसेनेच्या (Shivsena) पक्षांतर्गत वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी प्रा. हाके यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उठवत प्रा. लक्ष्मण हाके यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या वेशभूषेत जाऊन माढा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. हाके हे फुले यांच्या वेशभूषेत आल्यामुळे त्यांनी भरलेल्या अर्जाची चर्चा झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) बिघाडी मात्र पुढे आली होती.

Laxman Hake
Solapur, Madha Lok Sabha : मोहिते पाटील-शिंदेंचे कडवे आव्हान; मोदींच्या सातपुते, निंबाळकरांसाठी स्वतंत्र दोन सभा

अर्ज भरताना लक्ष्मण हाके काय म्हणाले होते?

माझी लढाई ही सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेतील सर्वांत मोठे डिफ्लॉटर आहेत, त्या मोहिते पाटील यांच्याशी आहे. निंबाळकर यांचं तर आम्ही डिपॉझिट जप्त करू. शरद पवार यांनी धनगर समाजाला एक तिकिट देण्याची दानत दाखवली नाही. त्याचे प्रत्यंतर इतर मतदारसंघात त्यांना भोगायला मिळेल. महादेव जानकर हे महायुतीसोबत गेल्यानंतर सात लाख लोकसंख्येतून त्यांना धनगर समाजातून एक उमेदवार भेटू शकत नाही का?, आम्ही कारखानदार नाही म्हणून तुम्ही आम्हाला टाळता का?, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी पवारांना केला होता.

Laxman Hake
Madha Lok Sabha : मोठ्या पक्षाच्या उमेदवाराच्या अर्जात त्रुटी; पण आक्षेप माझ्या अर्जावर; मोहिते पाटलांंचा इशारा कोणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com