Bhavana Gawali
Bhavana GawaliSarkarnama

Lok Sabha Election 2024 : सभागृहात भावना गवळींनी विचारले, ‘शकुंतला’चे काय करणार?

Bhavana Gawali : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा खासदार भावना गवळी सक्रिय.
Published on

Lok Sabha Election 2024 : यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे अत्यावश्यक आहे. या मार्गासाठी अनेकदा सर्वेक्षण झाले. मात्र, या प्रकल्पाला गती मिळाली नाही. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरिता 750 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लवकरच या मार्गावर कळंबपर्यंत रेल्वे धावणार आहे. आता शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला पाहिजे, असे यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी सभागृहाला सुचवले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार भावना गवळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यातल्या त्यात यवतमाळ जिल्ह्यात कपाशीचे भरघोस उत्पन्न घेतले जाते. मात्र, बीटी थ्री बियाण्यांवर बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती नुकसानीची ठरत आहे. या शेतकऱ्यांसाठी आता भावना गवळी सरसावल्या आहेत.

Bhavana Gawali
Bhavana Gawali : महायुतीच्या नेत्यांना भावना गवळींची थेट धमकी; म्हणाल्या, ‘फिर जो भी होगा...’

बीटी थ्रीला परवानगी देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून प्रलंबित आहे. या प्रकरणाकडे लक्ष घालून त्याचा निपटारा करून बीटी थ्रीला परवानगी देणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना ऑर्गेनिक शेती करायची असेल त्यांनी ती करावी. मात्र, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची बीटी बियाण्याची मागणी असल्यामुळे देशात बिटी बियाण्याला परवानगी देणे आवश्यक असल्याचे भावना गवळी यांनी सभागृहाला सांगितले. शेतकरी सोयाबीनसह अन्य पीक जेव्हा घरी आणतात, नेमके त्याच वेळी कृषी मालाचे दर पडतात.

शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते, असा प्रकार होऊ नये म्हणून सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असेही त्यांनी सुचवले. नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे खासदार गवळी म्हणाल्या. १ फेब्रुवारी २०२४ ला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्यात आला. या योजनेअंतर्गत देशभरातील ग्रामीण भागातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. महिलांचा देशाच्या विकासात हातभार वाढावा, याकरिता या योजनेचे लक्ष 10 कोटींपर्यंत करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बचत गटाच्या महिला कर्जाची परतफेड नियमितपणे करतात. त्यांचे बॅंकाकडे क्रेडिट आहे. या महिलांना यापेक्षाही जास्त सहकार्य केल्यास घराघरांत लघू उद्योग सुरू होईल आणि देश प्रगती पथावर जाईल. “भारत की नारी सबसे भारी” असे म्हणत गवळी यांनी संसदेत महिलांची बाजू जोरदारपणे मांडली. केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेचा लाभ सर्वच नागरिकांना मिळावा, याकरिता आवश्यक असलेले कार्ड काढण्यासाठी बचत गटाच्या महिलांना काम देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा निर्णय भावना गवळी आणि यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून घेतला. याबाबतसुद्धा संसदेत गवळी यांनी माहिती दिली. महाभारतातील अर्जुनाचे जसे मासोळीच्या डोळ्यावर लक्ष होते. तसेच देशाचे पंतप्रधान मोदी यांचे देशाच्या विकासावर लक्ष आहे. सर्वच क्षेत्रातील विकासामुळे देशातील जनता सत्तर वर्षांचा कार्यकाळ विसरली असून, आता 'मोदी है तो मुमकीन है'चा नारा देत असल्याचे गवळी यांनी संसदेत सांगितले. देशातील पिढी कर्तृत्ववान व्हावी व विद्यार्थ्यावर चांगले संस्कार व्हावेत, याकरिता गुरुकुलांची निर्मिती व्हावी आणि याकरिता सरकारने पैसे उपलब्ध करून देण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com