Lok Sabha Election 2024: वंचितच्या उमेदवारांचं चाललंय तरी काय? आधी बांदल आता मोरेंनी घेतली महायुतीच्या नेत्याची भेट

Akola Lok Sabha Election 2024: वसंत मोरे यांनी अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी वंचितमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर ते अकोला येथे मुक्कामी होते, या दरम्यान त्यांनी अमोल मिटकरी यांची भेट घेतली.
MLA Amol Mitkari, Vasant More
MLA Amol Mitkari, Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Vasant More meet MLA Amol Mitkari: मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर वसंत मोरे Vasant More यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोरे यांनी प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोला येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वंचितमध्ये प्रवेश केलेल्यानंतर वंसत मोरे यांनी आज (6 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari यांची भेट घेतली. मिटकरी आणि मोरे यांच्या भेटीमुळे सध्या वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

वसंत मोरे Vasant More यांनी अकोल्यातील प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्या निवासस्थानी वंचितमध्ये VBA प्रवेश केला. या प्रवेशानंतर ते अकोला येथे मुक्कामी होते. या वेळी त्यांनी मिटकरी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान मिटकरींनी सहकुटुंब मोरेंचं स्वागत केलं आणि काही काळ या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, शिरूरमध्ये 'वंचित'ने पैलवान मंगलदास बांदल Mangaldas Bandal यांना उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला होता. मात्र, या मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांची भेट घेणं बांदल यांना चांगलंच भोवलं, कारण वंचितने बांदल यांची लोकसभेची उमेदवारीच रद्द केली आहे. अशातच आता मोरेंनी मिटकरींची भेट घेतल्याने विविध चर्चां रंगू लागल्या आहे.

वसंत मोरे हे मनसेचे MNS फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे. पुण्यातील कात्रज Katraj भागातून 15 वर्ष ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. मनसेने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांनी मनसेच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या निर्णयाचा उघडपणे विरोध केला होता. पक्षाचा आदेश डावलला म्हणून वसंत मोरे यांची मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही वसंत मोरे मनसेतच होते.

MLA Amol Mitkari, Vasant More
Loksabha Election 2024 : उमेदवार बदलूनही 'वंचित' निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर, उमेदवाराचा अर्ज बाद...

मात्र, यंदाची लोकसभा Lok Sabha लढवण्याची मोरे यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी अनेक पक्षांची चाचपणी करायला सुरुवात केली होती. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोरेंनी खासदार शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांची भेट घेतली होती. वसंत मोरेंना आघाडीकडून पुणे Pune लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.

MLA Amol Mitkari, Vasant More
Lok Sabha Election : प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा धुडकावत आनंदराज यांची अचानक माघार; केले गंभीर आरोप...

मात्र, काँग्रेसकडून Congress पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच मोरेंनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीनंतर मोरे यांना वंचितकडून पुण्यातील मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यातली घरी जाऊन वंचितमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com