Yavatmal Loksabha : वंचित बहुजन आघाडीने यवतामाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभा सुभाष पवार यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र, ही उमेदवारी बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. पण अभिजित राठोड हेदेखील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेले आहेत. त्यांचा उमेदवार अर्ज बाद करण्यात आला आहे.
वंचितने (VBA) यवतमाळचा उमेदवार ऐनवेळी बदलला. नामांकनाच्या अखेरच्या दिवशी वंचितकडून अभिजित राठोड यांनी नामांकन दाखल केले. मात्र, नामांकन अर्ज पडताळणी करताना अर्जामध्ये त्रुटी राहिल्याने तो बाद झाला. त्यामुळे यवतमाळ मतदारसंघात वंचितचा उमेदवार असणार नाही.
उमेदवारी अर्ज बाद झाल्याने वंचितला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. कारण यवतमाळमधून उमेदवार नाही, तर अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना (anandraj ambedkar) पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनीदेखील अर्ज मागे घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामागचे गणित बंजारा मते मिळवण्याचे होते. मात्र, राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने वंचितचे गणित बिघडणार आहे. येथे वंचित कोणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेणार का? याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.