Lok Sabha Election 2024 : नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात लढणार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे ?

Nitin Gadkari : पहिल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्क्यांनी पराभव केला होता.
Vikas Thakre and Nitin Gadkari
Vikas Thakre and Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून भाजपचे हेविवेट नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून २०१९च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी लढत दिली होती. या वेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून कोण लढणार, याची उत्सुकता देशभरात लागलेली आहे. अशा स्थितीत एक महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे.

नागपुरात आज (ता. 19) काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीचे फोटोही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यामध्ये अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे निश्चित झाल्याची माहिती आहे. विकास ठाकरे यांच्या नावाला सतीश चतुर्वेदी सूचक, तर डॉ. नितीन राऊत अनुमोदक आहे, असे सांगितले जात आहे. गडकरींच्या विरोधात लढायचे तर उमेदवारही तेवढाच तगडा हवा आणि नागपूरच्या राजकारणात विकास ठाकरे काँग्रेसचे वजनदार नेते मानले जातात.

विकास ठाकरे नागपूरचे महापौरसुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळेच शहराच्या प्रत्येक परिसराची खडान् खडा माहिती त्यांना आहे. नागपुरात ते गडकरींना चांगली लढत देऊ शकतील, असे चित्र कॉंग्रेसच्या नेत्यांकडून उभे केले जात आहे. पहिल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा सुमारे पावणे तीन लाखांच्या मताधिक्यांनी पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मुत्तेमवार यांनी नागपूरमधून उमेदवारीच मागितली नाही. त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढले होते. त्यांचाही सुमारे सव्वा दोन लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vikas Thakre and Nitin Gadkari
Congress News : काँग्रेस सोडणे तर दूरच राहिले; 'या' पठ्ठ्याने महायुतीला सळो की पळो करून सोडले!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढणार नाही, हे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस नवा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी काँग्रेसच्या बैठकीत आमदार अभिजित वंजारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार यांच्या नावावर चर्चा झाली. यात वंजारी यांचे नाव आघाडीवर तेव्हा होते. पण आजच्या बैठकीत विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपची सर्वत्र ५१ टक्के मते घेण्याची मोहीम सुरू आहे. मात्र नितीन गडकरी यांनी सरासरी ५५.६१ टक्के मते घेऊन यापूर्वीच भाजपला ५१ टक्क्यांच्या पुढे नेऊन ठेवले आहे. मात्र, मुत्तेमवारांच्या तुलनेत पटोले यांच्या विरुद्ध गडकरी यांचे मताधिक्य सुमारे ७० हजार मतांनी घटले होते. पटोले लढले तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष नव्हते. ते नागपूरचेसुद्धा नाहीत, असे असताना त्यांना साडेचार लाखांच्या जवळपास मते मिळाली होती. ही काँग्रेसची या निवडणुकीसाठी जमेची बाजू आहे.

Edited By : Atul Mehere

R

Vikas Thakre and Nitin Gadkari
Nitin Gadkari : संघ मुख्यालयात नितीन गडकरींचा दबदबा ; अकोल्यात मात्र भाजप विरोधात घराणेशाहीची ओरड !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com