Congress News : काँग्रेस सोडणे तर दूरच राहिले; 'या' पठ्ठ्याने महायुतीला सळो की पळो करून सोडले!

Concluding meeting of Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत चोख असे नियोजन करून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा यशस्वी करून दाखवत भाजप आणि महायुतीच्या पोटात मोठा गोळा आणला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Congress News : राज्यात पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. राज्यात अमुक वेळी भूकंप होणार, अशा तारखा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना वारंवार दिल्या आणि त्यानुसार काही भूकंप झालेही. काही अंदाज खोटे ठरले. विरोधी पक्षनेतेच सत्ताधारी पक्षात जाण्याची जणू पंरपराच राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही भाजपमध्ये जाणार, या अफवांना, अंदाजांना मध्यंतरी बळ मिळाले होते. मात्र वडेट्टीवार यांनी या अफवाच असल्याचे सिद्ध करत महायुतीला हैराण करून सोडले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप 17 मार्च रोजी मुंबईत झाला. समारोपाच्या निमित्ताने झालेली सभा महायुतीला धडकी भरवणारी ठरली. राहुल गांधी यांनी मुद्देसूद भाषण करत केंद्रातील भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती. व्यासपीठावरील नेत्यांची मांदियाळी ही इंडिया आघाडी भक्कम असल्याचा संदेश देणारी होती.

या सभेत नेत्यांनी केलेल्या भाषणांना महायुतीचे नेते आता एकापाठोपाठ उत्तरे देत आहेत. याचाच अर्थ असा की सभेने अपेक्षित उद्दीष्ट साध्य केले आहे. या सभेचे नियोजन वडेट्टीवार यांनी केले होते, ते पूर्णपणे यशस्वी ठरले. भाजपमध्ये जाणार जाणार अशा अफवा ज्यांच्याबाबत सातत्याने उठवण्यात आल्या, त्या विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुतीला या अर्थाने हैराण करून सोडले आहे.

Vijay Wadettiwar
Pune Lok Sabha Constituency 2024: चंद्रकांतदादांनी जाहीर केला काँग्रेसचा पुणे लोकसभेचा उमेदवार ?

राज्यात पक्षांतराची जणू लाटच आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) मध्ये तर ऐतिहासिक फूट पडली. या फुटीची लागण काँग्रेसलाही झाली. दोनवेळा मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. याच्या काही दिवसांपूर्वीच नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता, तो खरा ठरला.

भाजप (BJP) चे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षही भाजपमध्ये जाणार असा दावा केला होता. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांच्या भाजप प्रवेशाने आशिष देशमुख यांचाही तो दावा खरा ठरला. काही दिवसांपूर्वीच बसवराज पाटील हे भाजपवासी झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसमध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते. अजितदादा पवार हेही विरोधी पक्षनेते होते. एकनाथ शिंदेही एकेकाळी विरोधी पक्षनेते होते. विखे पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. ही प्रकरणे ताजीच असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही भाजपमध्ये जाणार असल्याचे दावे केले जाऊ लागले, तशा अफवा पसरवण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार होते, असा दावा केला होता. शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत गेल्यानंतर अजितदादा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर वडेट्टीवार यांनी अजितदादांवर चरणदास अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना मिटकरी यांनी वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार होते, त्यासाठी त्यांनी कुणाकुणाची भेट घेतली, हे आपल्याला माहीत असल्याची टीका केली होती.

Vijay Wadettiwar
Iqbal Singh Chahal Transfer : ठाकरेंनी आणलेल्या, शिंदेंनी गोंजारलेल्या चहलांना थेट इलेक्शन कमिशनचा दणका

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईतील समारोपाची सभाही या प्रतिसादाला अगदी तंतोतंत साजेशी अशी झाली. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. व्यसपीठावर इंडिया आघाडीच्या 400 नेत्यांना स्थान देण्यात आले होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची इंडिया आघाडीची ही एकी भाजपच्या पोटात गोळा आणणारी होती. याचे सर्व श्रेय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जाते.

राहुल गांधी यांची यात्रा राज्यात आल्यानंतर समारोपापर्यंत सर्व प्रकारचे नियोजन त्यांनीच केले होते. सरकारच्या विरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेणाऱ्या वडेट्टीवार यांनी समारोपाच्या सभेचेही आक्रमकपणे नियोजन केले. अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असला तरी काँग्रेसमध्ये लढण्याची उर्मी अजूनही शिल्लक आहे, हे वडेट्टीवार यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी साधलेले टायमिंग अचूक आहे.

(Edited by Amol Sutar)

Vijay Wadettiwar
Imtiaz Jaleel News: मुंबईतून लढणार ही पुडीच ठरली, इम्तियाज जलील पुन्हा संभाजीनगरातूनच मैदानात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com