Lok Sabha Election Result : नरेंद्र मोदींना निकालाआधीच रामटेकमधील पराभवाचा अंदाज, थेट बैठकीत विचारला होते...

Narendra Modi Ramtek Lok Sabha constituency : रामटेकमध्ये महायुतीचा उमेदवार पराभूत झाला. निकाला आधीच पराभवाची कल्पना मोदींना आली असावी, अशीही चर्चा होत आहे.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

Narendra Modi : रामटेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव झाला. या मतदारसंघातून तिकीट नाकारलेले कृपाल तुमाने यांनी या पराभवासाठी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरले. मात्र, या पराभवाचा अंदाज नरेंद्र मोदींना प्रचारा वेळीच आला होता. त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांना रामटेकमधून कोण जिंकणार, अशी विचारणा केली होती.

पंतप्रधान मोदींनी Narendra Modi नागपूरची निवडणूक आटोपल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांनी मतदानाचा टक्का इतका का कमी झाला, अशी विचारणा केली होती. अनेकांनी उन्हाचे कारण सांगून वेळ मारून नेली. तेव्हा त्यांनी 'नागपूरवाले कभसे धुपसे डरने लगे, अशी उलट विचारणा करून सर्वांना निरुत्तर केले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना ‘रामटेकसे कोण जित के आ रहा है' अशी विचारणी केली होती.

रामटेकमध्ये महायुतीचा उमेदवार पराभूत झाला. हे बघता मोदी यांना आधीच पराभवाची कल्पना आली असावी, अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या शहरात जातात तेथे ते प्रथम पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतात.

Narendra Modi
Krupal Tumane : खरे व्हिलन चंद्रशेखर बावनकुळे, सर्वेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव, शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

विमानतळावरसुद्धा फावलेल्या वेळेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलत असतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते दोन वेळा नागपूरला आले होते. येथील राजभवनावर त्यांनी रात्रभर मुक्कामसुद्धा केला होता. तेव्हासुद्धा बड्या नेत्यांपेक्षा त्यांनी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटणे पसंत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com